IND vs SL: यशस्वी जयस्वाल निरोशन डिकवेलाच्या कानाजवळ काय गुंजगुंजला? एका झटक्यात मिळाली विकेट
GH News August 19, 2026 05:16 PM

Yashasvi Jaiswal Sledging: भारतीय संघाने शुबमन गिलच्या नेतृत्वात श्रीलंकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अपेक्षित कामगिरी केली. पाचव्या दिवशी लंच ब्रेकनंतर धडाधड विकेट घेतल्या आणि विजय पक्का केला. पण लंच ब्रेकपूर्वी मिळालेली सहावी विकेट विशेष होती. त्यामुळे भारतीय संघाची विजयाच्या दिशेने कूच सुरू झाली आणि श्रीलंकेवर दबाव वाढला. यशस्वी जयस्वालने निरोशन डिकवेलाला डिवचलं आणि त्याची विकेट काढण्यास मदत केली. निरोशन डिकवेलाची विकेट दुसऱ्या डावातील 60व्या षटकात लंच ब्रेकपूर्वी मिळाली. यशस्वी जयस्वालने निरोशन डिकवेलाला एक आव्हान दिलं आणि त्याचं लक्ष विचलीत केलं. अस्वस्थ झालेल्या डिकवेलाने चूक केली आणि त्याचा फायदा विकेटमधून मिळाला.  त्याची विकेट घेण्यापूर्वी यशस्वी जयस्वालने त्याच्या कानजवळ गुंजगुंजला होता आणि त्याला षटकार मारण्यासाठी उकसवलं होतं.

भारत श्रीलंका कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात निरोशन डिकवेला स्ट्राईकला आल्यानंतर यशस्वी जयस्वालने त्याला डिवचलं. जयस्वाल म्हणाला की, ‘तू चौकार नाही मारू शकत. जर तुझ्यात दम असेल तर विकेटकीपरच्या डोक्यावरून षटकार मारून दाखव.’ त्याच्या या स्लेजिंगला डिकवेलाने तसंच उत्तर दिलं. डिकवेला म्हणाला की, ‘मी तुला दाखवतो की विकेटकीपरच्या डोक्यावरून षटकार कसा मारतात ते.’ पण आव्हान काही त्याला पेलता आलं नाही. उलट त्याचं नुकसान झालं. या संवादामुळे डिकवेलाचं लक्ष पूर्णपणे विचलित झालं होतं. त्यात कृष्णाने टाकलेल्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर पंतच्या हाती झेल देऊन बाद झाला. डिकवेला 17 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.

अजय जडेजा आणि अजिंक्य रहाणेने केलं कौतुक

यशस्वी जयस्वालची रणनिती कामी आली आणि निरोशन डिकवेलाची विकेट मिळाली. अजिंक्य रहाणे म्हणाला की, गोलंदाजाला विकेट मिळवून देण्यासाठी खेळाडूची गरज असते. अशा शा‍ब्दिक चकमकीमुळे सामन्याची रंगत वाढते. अजय जडेजा म्हणाला की, जर सर्व काही नियमांच्या चौकटीत राहून केलं असेल तर त्यात काही चुकीचं नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.