Bangladeshi Actress: काही गोष्टी अशा असतात की, आपल्याला विचार करायला भाग पाडतात (Raima Islam Shimu). आपलीच माणसं खरंच आपल्या मृत्यूचं कारण बनू शकतात? या एका प्रश्नामुळे डोकं चक्रावून जातं. बांग्लादेशी अभिनेत्री (Bangladeshi Actress) रायमा इस्लाम शिमू, हिच्यासोबत देखील असंच काहीसा प्रकार घडला. चार वर्षांपूर्वी अभिनेत्रीची हत्या करण्यात आली. अभिनेत्रीच्या हत्यामागे तिचाच पती सखावत अली नोबेल याचा हात असल्याची माहिती समोर आली. हत्येमागचं नेमकं प्रकरण काय? या प्रकरणाचा छडा कसा लागला? पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी कसे गेले? जाणून घेऊयात.
रायमा इस्लाम शिमू हिच्या धक्कादायक हत्येचं प्रकरण 2022 साली समोर आलं होतं. 16 जानेवारी 2022 साली अभिनेत्री सकाळी साधारण 7 वाजेच्या दरम्यान, घरातून निघाली होती. कुटुंबाच्या म्हणण्यांनुसार, अभिनेत्री शूटसाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर गेली होती. परंतु, अभिनेत्री शूटिंग लोकेशनपर्यंत पोहोचली नाही. अभिनेत्रीला फोन देखील लागत नव्हता. रात्र झाल्यानंतरही रायमा घरी पोहोचली नव्हती. अभिनेत्रीच्या बहिणीने शेवटी पोलिसांत बहीण हरवली असल्याची तक्रार दाखल केली होती. यावेळी केरानीगंज परिसरात पोलिसांना पुलाजवळ झुडपात एक गोणी सापडली.
पोलिसांना सापडेल्या गोणीमध्ये एका महिलेची बॉडी देखील आढळली. या बॉडीला 2 भागात कापून ठेवले होते. या प्रकरणानंतर अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला, तसेच पेलीस तपासाला सुरुवात करण्यात आली. यानंतर बॉडीची ओळख पटवण्यात आली. माहितीनुसार ती बॉडी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू हिची असल्याची माहिती समोर आली आहे. रायमाच्या हत्येच्या संशयाची सुई सिनेइंडस्ट्रीत वळली. पोलिसांनी अभिनेता जायद खानची विचारपूस केली. पोलीस तपासात काहीच आढळलं नाही.
यानंतर पोलिसांना या हत्येच्या संबंधित मोठा पुरावा कुटुंबाच्या कारमधून सापडला. तपासादरम्यान, कारमधून ब्लीचचा तीव्र दुर्गंध येऊ लागला होता. पोलिसांना यावरुन संशय आला. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांना कारमध्ये नायलॉनची दोरी सापडली. विशेष म्हणजे ती दोरी गोणीला देखील बांधण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीचा पती, सखावत अली नोबेल याची चौकशी केली. सखावत आणि त्याचा मित्र एसएमवाय अब्दु्ल्लाह फरहादसह 6 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, सखावतने आपल्या पत्नीची हत्या केली असल्याचं कबूल केलं.
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, रायमा आणि तिच्या पतीचे कडाक्याचे भांडण झाले. सखावतने रायमाला मारहाण केली. तसेच गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर त्याने मित्राची मदत घेऊन रायमचा मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिचा पती आणि मित्रावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. परंतु, अंतिम न्यायालयीन निकाल अद्याप लागलेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या: