मुंबई: सायन रेल्वे स्थानकात आज (गुरुवारी, ता २७) सकाळी एकच खळबळ उडाली. उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर असलेल्या व्यक्तीने (Mumbai News) नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून रेल्वे स्थानकातील (Mumbai News) टॉवरवर चढून गळफास घेत आत्महत्येचा (Mumbai News) प्रयत्न केला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, शिताफीने बचाव मोहीम राबवून या व्यक्तीला (Mumbai News) खाली उतरवले आणि सीपीआर (CPR) देऊन त्याचा जीव वाचवला.(Mumbai News)
सकाळी पावणे आठ ते आठ वाजण्याच्या सुमारास सायन रेल्वे स्थानकातील एका हाय व्होल्टेज टॉवरवर (Mumbai News) एक व्यक्ती चढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य (Mumbai News) ओळखून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टॉवरवर चढलेल्या व्यक्तीची समजूत काढून त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले. मात्र, पोलिसांचे ऐकण्याऐवजी त्या व्यक्तीने टॉवरवरच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही दृश्ये पाहून स्थानकातील प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. (Mumbai News)
व्यक्तीने गळफास घेताच टॉवरखाली तैनात असलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता अत्यंत कौशल्याने टॉवरवर चढून त्या व्यक्तीला खाली उतरवले. तोपर्यंत त्या व्यक्तीचा श्वास थांबल्यासारखा झाला होता. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ त्याला 'सीपीआर' दिला. जवानांच्या या सतर्कतेमुळे आणि ऐनवेळी दिलेल्या वैद्यकीय मदतीमुळे त्या व्यक्तीला पुन्हा श्वास मिळाला आणि त्याचा जीव वाचला. (Mumbai News)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही व्यक्ती सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी असून व्यवसायाने डॉक्टर आहे. संबंधित संस्थेत वैद्यकीय प्रमाणपत्र वेळेवर जमा न करू शकल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. याच अन्यायाविरोधात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. "मला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे आणि माझ्यावर अन्याय करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी," या मागणीसाठी तो सायन स्थानकातील टॉवरवर चढला होता. या घटनेमुळे सायन रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या व्यक्तीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Mumbai News)