नेपाळ महाप्रलय! 30 हून अधिक देशांचे लोक बेपत्ता, मृतांचा आकडा वाढला, 36 तासानंतर नेमकी कशी आहे परस्थिती? 
गणेश लटके August 27, 2026 10:43 PM

Nepal Flood News : नेपाळमधील तिबेटमध्ये महापूर आल्यानं भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. मोठा विध्वंस झाला आहे. या महापुरात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या महाप्रलायाचा फटका फक्त नेपाळलाच नाहीतर जगातील अनेक देशांना बसला आहे. नेपाळ महाप्रलयात 30 हून अधिक देशांचे लोक बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, सिंगापूरचे आठ, जर्मनीचे आठ आणि रशियाचे आठ पर्यटकही बेपत्ता आहेत. दक्षिण आफ्रिकेचे सहा, लाटव्हियाचे सहा आणि जपानचे पाच जण बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मृतांची संख्या वाढली

दरम्यान, तिबेटमध्ये बुधवारी हिमनदी फुटल्यानंतर चीन-नेपाळ सीमा भागात प्रचंड विध्वंस झाला आहे. पूर आणि ढिगाऱ्यांमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला, तर मोठ्या प्रमाणात लोक अजूनही बेपत्ता आहेत. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 359 हून अधिक लोकांच्या मृत्यू झाल्याची माहिती आहे. 1500 हून हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकांचा समावेश आहे जे एकतर ट्रेकिंगसाठी या भागात पोहोचले होते किंवा हिंदू पवित्र स्थळांना भेट देत होते. रसुवामधून 17, नुवाकोटमधून 28, धाडिंगमधून 33, चितवनमधून 132, गोरखामधून 30, तनहुनमधून 22, नवलपरासी पूर्वेतून 82 आणि नवलपरासी पश्चिममधून 15 मृतदेह सापडले आहेत. पोलीस, लष्कर आणि इतर मदत संस्था बाधित भागात सातत्याने बचावकार्य करत असून, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

कुठे आणि किती लोक बेपत्ता?

नेपाळ पर्यटन मंडळाने  दिलेल्या माहितीनुसार, 517 विदेशी पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत. चीनच्या सरकारी मीडियानुसार, तिबेटच्या गीरोंग काउंटीमध्ये किमान तीन लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 558 लोक बेपत्ता आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले आहे की नेपाळकडून सुमारे 100 चीनी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या म्हणण्यानुसार, 65 अमेरिकन नागरिक बेपत्ता आहेत, तर मलेशियातील 51 लोक अद्याप बेपत्ता आहेत.

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 53 नागरिक बेपत्ता

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे 53 नागरिक बेपत्ता आहेत आणि 46 परदेशी पर्यटकांचा नेपाळी अधिकाऱ्यांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे 35, ब्रिटनचे 33 आणि कॅनडाचे 25 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमधील जलविद्युत प्रकल्प क्षेत्रात काम करणारे त्यांचे नऊ नागरिक बेपत्ता असल्याची पुष्टी दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनीही केली आहे.

नेपाळ पर्यटन मंडळानुसार सिंगापूरचे 8, जर्मनीचे 8 आणि रशियाचे 8 पर्यटकही बेपत्ता आहेत. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचे 6, लॅटव्हियाचे 6 आणि जपानचे 5 नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु खराब हवामान, दुर्गम डोंगराळ प्रदेश आणि जोरदार प्रवाह यामुळे या ऑपरेशनला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नेपाळ आणि चीन या दोन्ही यंत्रणा संयुक्तपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

नेपाळमधील प्रलयात भारतातील 288 नागरिक अडकल्याची माहिती 

नेपाळमधील प्रलयात भारतातील 288 नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे. तर या पुरात महाराष्ट्रातील 80 नागरिक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. तर अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. (Nepal Floods Marathi News) 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.