मॅच ड्रॉ होताच टीम इंडिया संकटात, आता या 2 टीम फायनलच्या शर्यतीत; भारतासोबत काय गेम झाला?
GH News August 27, 2026 11:15 PM

भारताने श्रीलकेविरुद्धची मालिका 1-0 ने जिंकली तरी भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. कारण या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ड्रा झाल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत झालेली उलथापालथ भारताच्या काहीच फायद्याची नाही. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी आता करो या मरोची लढाई करावी लागणार आहे. खरं तर दुसरा कसोटी सामना जिंकला असता तर भारतीय संघ चौथ्या स्थानावर विराजमान झाला असता. पण हा सामना गमावल्याने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. या सामन्यापूर्वी भारताचे 10 सामन्यात 64 गुण आणि विजयी टक्केवारी ही 53.33 टक्के होती. आता हा सामना ड्रॉ झाल्याने 68 गुण झाले आहेत. तर विजयी टक्केवारीत घट झाली असून ती 51.52 टक्के झाली आहे.

भारताचं अंतिम फेरीचं गणित काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 या साखळीत भारताला आणखी दोन मालिका खेळायच्या आहे. एक मालिका देशाबाहेर आणि एक देशात असणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका त्यांच्या देशात होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. भारताला सात पैकी सात सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. जर भारताने हे सातही सामने जिंकले तर 84 गुण मिळतील आणि एकूण गुण हे 152 होतील. तर विजयी टक्केवारी 70.37 टक्के होईल. त्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता अंतिम फेरीचं तिकीट मिळेल.

भारताने सहा सामन्यात विजय आणि 1 ड्रॉ केला तर विजयी टक्केवारी 64.81 टक्के होईल. पाच विजय, एक पराभव आणि 1 सामना ड्रॉ झाला तर 62.96 टक्के विजयी टक्केवारी राहील. या दोन्ही शक्यता अंतिम फेरीसाठी अनुकूल आहेत. पण यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे भारतीय संघाला किमान पाच सामने जिंकणं भाग आहे. दोन सामन्यात पराभव होताच अंतिम फेरीचं तिकीट कापलं जाईल.

अंतिम फेरीसाठी प्रबळ दावेदार कोण?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे प्रबळ दावेदार मानले जात आहे. या दोन्ही सघांची विजयी टक्केवारी जबरदस्त आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 10 कसोटी सामन्यात 96 गुण आणि विजयी टक्केवारी 80 टक्के आहे. तर दक्षिण अफ्रिकेने 4 कसोटी सामन्यात 75 टक्के विजयी टक्केवारी मिळवली आहे. त्यामुळे गुणतालिकेत टॉपला असलेल्या या दोन संघांना अंतिम फेरीची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. फार तर न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघात चढाओढ असेल. पण ऑस्ट्रेलियाचं अंतिम फेरीत खेळणं जवळपास निश्चित आहे.

ऑस्ट्रेलियाचे 12 सामने, तर दक्षिण आफ्रिकेचे 10 सामने खेळायचे शिल्लक आहेत. यात ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांची कसोटी मालिका आहे. तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका आणि भारताविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दक्षिण अफ्रिका बांगलादेशविरुद्ध 2 सामने, इंग्लंडविरुद्ध 3 सामने आणि श्रीलंकेविरुद्ध 2 सामने खेळणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.