आता बचत खात्यांवरही मिळणार मोठा फायदा! 'या' बँकांकडून व्याजदर वाढ, तुमचं खातं कोणत्या बँकेत? 
गणेश लटके September 10, 2026 11:43 PM

Savings account : बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही तुमचे पैसे बचत खात्यात ठेवत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. बँका ग्राहकांना बचत खात्यांवर व्याज देतात. परंतु हा व्याजदर सर्व बँकांमध्ये सारखा नसतो. काही बँका शिल्लक रक्कम वाढल्यास जास्त व्याजदर देतात. अलीकडेच, काही बँकांनी त्यांच्या बचत खात्याच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. त्यामुळे, नवीन खाते उघडण्यापूर्वी किंवा बँक बदलण्यापूर्वी, वेगवेगळ्या बँकांनी देऊ केलेल्या व्याजदरांची माहिती घेणं महत्त्वाचे आहे. जाणून घेऊयात वेगवेगळ्या बँकांमध्ये कोणते व्याजदर दिले जातात.

कॅनरा बँकेत ठेव रकमेवर आधारित व्याज

कॅनरा बँकेने देशांतर्गत आणि NRE/NRO बचत खात्यांवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. ठेव रक्कम वाढल्यास व्याजदर बदलतो.

100 कोटींपर्यंतच्या ठेवींवर 2.50 टक्के व्याज.
100 कोटी ते 300 कोटींपेक्षा कमी ठेवींवर 2.65 टक्के व्याज.
300 कोटी ते 500 कोटींपेक्षा कमी ठेवींवर 3.10 टक्के व्याज.
500 कोटी ते 1000 कोटींपेक्षा कमी रकमेवर 3.40 टक्के व्याज.
1000 कोटी ते 2000 कोटींपेक्षा कमी रकमेवर 3.55 टक्के व्याज.
2000 कोटी किंवा अधिक रकमेवर कमाल 4 टक्के वार्षिक व्याज.

युनियन बँक 6.25 टक्के पर्यंत व्याज देते

युनियन बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यांवर ठेव रकमेनुसार वार्षिक 2.50 टक्के ते 6.25 टक्के पर्यंत व्याजदर दिला जातो. बँक 50 लाख पर्यंतच्या ठेवींवर 2.50 टक्के व्याज देते, आणि जास्त रकमेसाठी व्याजदर वाढतो.
2000 कोटी ते 3000 कोटी दरम्यानच्या ठेवींवर 5.60 टक्के व्याज.
3000 कोटींवरील ठेवींवर 6.25 टक्के वार्षिक व्याज.

आयडीएफसी फर्स्ट बँकेत 7 टक्केपर्यंत व्याज

आयडीएफसी फर्स्ट बँकेने 1 सप्टेंबरपासून आपल्या बचत खात्याच्या व्याजदरात काही बदल केले आहेत. व्याजदर ठेव रकमेनुसार बदलतो.

3 लाख पर्यंतच्या ठेवींवर 2.50 टक्के वार्षिक व्याज.
3 लाख पेक्षा जास्त आणि 25 लाख पर्यंतच्या ठेवींवर 7 टक्के वार्षिक व्याज.
25 लाखांवरील आणि 5 कोटींपर्यंतच्या ठेवींवर 6.25 टक्के व्याज.
5 कोटींवरील ठेवींवर 5 टक्के वार्षिक व्याज.

बँक ऑफ इंडियामध्ये 6.25 टक्के पर्यंत व्याज

खरं तर, बँक ऑफ इंडियाने 1 सप्टेंबरपासून बचत ठेव दरांमध्येही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. बँकेचा व्याजदर ठेव रकमेनुसार ठरवला जातो.

50 कोटींपर्यंत 2.50 टक्के व्याज.

50 कोटी ते 250 कोटींपर्यंत 2.60 टक्के व्याज.
250 कोटी ते 500 कोटींपर्यंत 2.75 टक्के व्याज.
500 कोटी ते 1,000 कोटींपर्यंत 3 टक्के व्याज.
1,000 कोटी ते 1,500 कोटींपर्यंत 3.15 टक्के व्याज.
1500 कोटी ते 2000 कोटी पर्यंत 3.30 टक्के व्याज.
2000 कोटी ते 2500 कोटी दरम्यानच्या ठेवींवर 4.75 टक्के व्याज.
2500 कोटी ते 3000 कोटी दरम्यानच्या ठेवींवर 5.70 टक्के व्याज.
3000 कोटींवरील ठेवींवर 6.25 टक्के वार्षिक व्याज.

केवळ व्याजदरांवर आधारित बचत खाते निवडू नका

बचत खाते निवडताना, केवळ उच्च व्याजदर पाहणे पुरेसे नाही; बँकेच्या किमान शिल्लक रकमेची आवश्यकता, एटीएम आणि डिजिटल बँकिंग सुविधा, शुल्क आणि इतर सेवांची तुलना करणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणून, तुमच्या गरजा आणि बँक देत असलेल्या वैशिष्ट्यांनुसार बँक निवडा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.