सांगलीचे आराध्य दैवत गणपती बाप्पा असून सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून आता सांगलीचे राजे पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता आहे. आज सकाळी गणपती मंदिरात अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री यांनी नूतन युवराज आदित्यराजे यांना डावलत गणपती मंदिरात आरती केल्याने वादाला सुरुवात झाली आहे. यावेळी मी वारसदार असल्याचा दावा करत अभिनेत्री भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन उत्सव मूर्तीची आरती केली. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली असून सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी कोण यावरून पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाग्यश्री पटवर्धन यांनी सकाळीच सांगलीचं मुख्य गणपती मंदिर गाठत मंदिराच्या गाभाऱ्यात ठिय्या मारला. यावेळी प्रतिष्ठापना करण्यासाठी उत्सव मूर्ती दरबार हॉलकडे जाण्यासाठी आरती करण्यात येणार होती. यासाठी नूतन युवराज आदित्य राजे पटवर्धन यांना बोलवण्यात आले, मात्र त्यांना थांबवत भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरती केली. या प्रकारामुळे सर्वजण अचंबित झाले. तसेच राजेंची तब्यत बरी नसते त्यामुळे आम्ही मुली पैकी कोणी तरी यावे आणि आरती करावी असंही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान तुम्ही मला सांगणारे कोण असा सवालही सवाल यावेळी भाग्यश्री यांनी केला आहे.
दरम्यान या घटनेमुळे राजेसाहेब विजयसिंह पटवर्धन चांगलेच संतप्त झाले. मी राजा या नात्याने आदित्य पटवर्धन यांना राजकुमार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे आदित्य राजेच संस्थांनाचे पुढचे राजे असणार आहेत. युवराजांना थांबवून भाग्यश्री यांनी आरती करने आणि लोकांना घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात घुसने योग्य नसल्याचे राजे विजयसिह पटवर्धन यांनी स्पष्ट केले. त्यांना असे करण्याचा अधिकार नसल्याचे विजयसिंह राजे पटवर्धन यांनी स्पष्टीकरण दिले आहॆ. त्यामुळे भाग्यश्री आणि पती हिमालय यांच्याशी संस्थानांच्या मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार न करण्याचे आवाहन राजे साहेबांनी केले आहॆ. आणि आदित्य राजे पटवर्धन हेच संस्थांनाचे उत्तराधिकारी असतील आणि सांगलीकर जनतेने त्यांना साथ द्यावी असे आवाहन देखील यावेळी विजयसिंह पटवर्धन यांनी केलं आहे.