हत्ती, घोडे, कोंबड्या आणणार नाही, नियम मोडल्यास थेट…मनोज जरांगेंचा आंदोलनासाठी नवा अर्ज; काय काय मान्य केलं?
admin September 14, 2026 11:27 PM
[ad_1]

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुंबईमध्ये येऊन उपोषण करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने उपोषणाला परवानगी मिळावी यासाठी मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी दोनदा त्यांना या उपोषणासाठी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांनदा परवानगीसाठी अर्ज केला आहे. जी कारणं सांगून पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाची परवानगी नाकारली होती,  त्या सर्व अटींचं पालन करण्यास आपण तयार असल्याचं या अर्जामध्ये जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

अर्जामध्ये जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलं? 

मराठा समाजाच्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान, मुंबई येथे शांततेच्या मार्गाने जाहीर उपोषण करण्यात येणार आहे. सदर आंदोलन संपूर्णत: शांततेच्या मार्गाने, लोकशाही आणि घटनात्मक चौकटीत राहून करण्यात येणार असून, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही, याची आयोजकांकडून पूर्ण दक्षता घेतली जाईल असं या अर्जामध्ये म्हटलं आहे. या अर्जामध्ये एकूण 20 अटी मान्य करण्यात आल्या आहेत.

ज्यामध्ये कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यावर त्यास दाखवण्यासाठी दिलेल्या पवानगीची मूळ प्रत सोबत बाळगली जाईल. अर्जामध्ये नमूद जेवढी आंदोलकांची संख्या आहे, ती तेवढीच मर्यादीत राहील याची काळजी घेतली जाईल. तसेच या आंदोलनामध्ये सहभागी झालेला कोणताही व्यक्ती चिथावणीखोर भाषणं, अथवा जमावाची भावना भडकवणारी भाषणं करणार नाही. तेसच आम्ही खात्रीने सांगतो, की ट्रॅक्टर, ढकलगाडी (ट्रॉली), बैलगाडी, सायकल रिक्षा, हातगाडी, यांसह कोणंतीही वाहने किंवा पक्षी, घोडे, हत्ती, उंट, कोंबड्या इत्यादींसारखे प्राणी धरणे, निरदर्शने सुरू असलेल्या ठिकाणी आणली जाणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांना आपल्या अर्जामध्ये म्हटलं आहे. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.