“बेशक संघर्ष के हमारे दिन लंम्बे है, पर…”, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत बॅनरबाजी
GH News July 27, 2024 03:10 PM

Uddhav Thackeray Birthday Banner : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. बेशक संघर्ष के हमारे दिन लंम्बे हैं, पर हमारे हौसले भी बूलंद हैं, असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सांगलीतील एका बॅनरवर उद्धव ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबईतील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या झळकणारा एक बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील चौकाचौकात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यातच इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झळकणाऱ्या एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “बेशक संघर्ष के हमारे दिन लम्बे हैं, पर हमारे हौसले भी बूलंद हैं…” अशा स्वरुपाचा आशय या बॅनरवर झळकताना दिसत आहे. त्यासोबतच यावर महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असेही लिहिण्यात आले आहे.

सांगलीत बॅनरबाजी

वांद्रे परिसरातील मातोश्री परिसरात उद्धव ठाकरे यांनाच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बनवायचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय, अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. तसेच सांगलीमध्येही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार बॅनर झळकत आहेत. यातील एका बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी हा बॅनर लावला आहे.

सांगली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी हे बॅनर झळकताना दिसत आहेत. यात उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने सध्या या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवसैनिकांचा उत्साह शिगेला

दरम्यान लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यामुळे उद्धव ठाकरे हेच महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा पुढील चेहरा असणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.