‘स्त्री 2’ च्या कोरिओग्राफरवर 21 वर्षांच्या मुलीच्या लैंगिक छळाचा आरोप, पीडितेने म्हटले- माझ्यासोबत अनेकदा…
Marathi September 17, 2024 01:24 AM

सिनेसृष्टीतून गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या समोर आल्या आहेत, ज्याने लोकांना हादरवले आहे. मल्याळम सिनेमात लैंगींक छळाची अनेक प्रकरणे समोर आल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे आणि आता ‘स्त्री 2’ सिनेमाच्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकाविरुद्ध 21 वर्षीय तरुणीसोबत लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

हिंदुस्थानी सिनेमाचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शेख जानी बाशा (जानी मास्टर) यांच्या विरोधात एका 21 वर्षीय मुलीसोबत अनेकदा लैगींक शोषण केल्याचा आरोप आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, जानी मास्टर यांच्याविरोधात हैदराबादच्या रायदुर्गम पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर दाखल केला आहे. 21 वर्षाच्या एका तरुणीने जानी मास्टर याने अनेकदा लैगींक छळ केल्याचा आरोप केला आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, पिडीत तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून जानी मास्टर याच्यासोबत काम करत आहे. तिने दावा केला आहे की, जानी मास्टर याने तिला आऊटडोअर शूटच्यावेळी अनेकदा लैगींक छळ केला. चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद शूट दरम्यान अनेकदा लैंगीक छळ केल्याचा आरोप केला आहे.

जानी मास्टरने नारसिंगी येथे पीडितेचा अनेकदा लैंगिक छळ केल्याचे पोलिसांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. ही तरुणी त्याच ठिकाणची रहिवासी आहे, त्यामुळे हे प्रकरण तेथील पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. जानी मास्टर विरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली, कलम 376 चे कलम 2, गुन्हेगारी धमकी अंतर्गत कलम 506 आणि जाणूनबुजून एखाद्याला दुखापत केल्याबद्दल कलम 323 च्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

जानी मास्टर याने साऊथसोबत हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. त्याने अल्लू अर्जुन, सलमान खान, रश्मीका मंदाना, तमन्ना भाटीया सहित अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. जानी मास्टरने जय हो, राचा, पुष्पा मधील श्रीवल्ली गाणे, स्त्री 2 मधील आज की रात, ‘खेल खेल मे’ मधील ‘डू यू नो’ सहित अनेक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.