औषधी वनस्पती लागवड ऑनलाइन कार्यशाळा
esakal September 19, 2024 07:45 AM

आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षांत औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा रविवारी (ता. २२) आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

‘महारे’रा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटची नोंदणी महारेराने नुकतीच रद्द केली आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नुतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नुतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाईन व ऑफलाइन बॅच सोमवारपासून (ता. २३) सुरू होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण वर्ग
एफपीसीची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, व्यवसाय नियोजन करणे, बाजार नियोजन करणे, मनुष्यबळ व्यवस्थापन करणे अशी जबाबदारी सीईओ पदावर असते. या पार्श्वभूमीवर २६ सप्टेंबरपासून पाच दिवसांचे ‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण आयोजिले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली, व्यवसाय आराखडा स्वरूप, बुक किपिंगचे महत्त्व, शासकीय योजनांची ओळख, या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, एफपीसी संचालक तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
संपर्क: ८४८४८२२३७७

शेतकरी कंपनी कामकाजासाठी २१ रजिस्टरचा संच
कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) अनुपालन प्रक्रियेबाबत बहुतांश शेतकरी कंपन्यांना पूर्ण माहिती नसल्याने नियमित अनुपालन करता येत नसल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. यामुळे बहुतांश कंपन्यांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागल्याचेही अनुभव आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी कंपन्यांना आवश्यक अशा २१ रजिस्टरचा संच विकसित करण्यात आला आहे. पारदर्शी, चोख व लेखी कारभार करण्याची पद्धती अवलंबत सर्वच घटकांमध्ये आपल्या कंपनीबाबतचा विश्वास वाढवण्यास हा संच उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक रजिस्टरमध्ये सुरवातीस या रजिस्टरचे महत्व आणि गरज स्पष्ट करण्यात आली आहे. सदर रजिस्टरमध्ये व्यवसाय माहिती कशा प्रकारे भरावी याचे दिशादर्शनही करण्यात आले आहे. कंपनी कायद्यानुसार आवश्यक अशी सात पुस्तके, कृषी निविष्ठा पुरवठा व्यवसायासाठी आवश्यक पाच पुस्तके, शेतमाल संकलन व विक्री व्यवसायासाठी आवश्यक सहा पुस्तके, कंपनी व्यवस्थापनासाठी आवश्यक पाच पुस्तके असा हा संपूर्ण संच असणार आहे.
संपर्क : ८४८४८२२३७७

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.