'आस्थापनांनी मूल्यांना महत्त्व द्यायला हवे'
esakal September 19, 2024 11:45 PM

पिंपरी, ता. १९ : ‘‘औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांनी मूल्यांना महत्त्व द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ज्ञ व भारत फोर्ज लिमिटेड कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध विभागाचे संचालक डॉ.संतोष भावे यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट एनआयपीएम व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स आयआयएमएस यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे ‘धोरणात्मक मनुष्यबळ व्यवस्थापन’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित असलेले एनआयपीएमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य एस. सी. गुप्ता, वाय. एस. सिद्धेगौडा, अमृता तेंडुलकर, सुनील सुतावणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब सोनावणे, आयआयएमएसचे चालक डॉ. शिवाजी मुंढे, एनआयपीएमचे पदाधिकारी सतीश पवार, डॉ. कीर्ती धारवाडकर, वहिदा पठाण, ॲड. प्रशांत क्षीरसागर, पवन शर्मा, योगेश रांगणेकर उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.