Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; बँक निफ्टीत मोठी वाढ, BSE शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले
esakal September 17, 2024 02:45 AM

Share Market Closing Latest Update 16 September 2024: शेअर बाजारांनी आज (16 सप्टेंबर) विक्रमी उच्चांक गाठला. बाजार बंद होताना चांगल्या वाढीसह बंद झाला. आज निफ्टीने 25,445 च्या विक्रमी पातळीला तर सेन्सेक्सने 83,184 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. बंद होताना निफ्टी 27 अंकांनी वाढून 25,383 वर बंद झाला.

सेन्सेक्स 97 अंकांनी वाढून 82,988 वर आणि निफ्टी बँक 215 अंकांनी वाढून 52,153 वर बंद झाला. बँक निफ्टीने तेजी दाखवली आणि मिडकॅप निर्देशांकानेही चांगली कामगिरी केली. मेटल आणि पॉवर शेअर्समध्ये चांगली वाढ झाली.

कोणते शेअर्स तेजीत?

भारतीय बाजाराला विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि अमेरिकन बाजारातील वाढ यामुळे पाठिंबा मिळाला. सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये एनटीपीसी, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो आणि आयसीआयसीआय बँक हे सर्वाधिक वधारले.

दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले, आयसीआयसीआय बँक आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस घसरणीसह बंद झाले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 2,364.82 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.07 टक्क्यांनी वाढून 71.66 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहे.

मार्केट कॅपमध्ये 1.78 लाख कोटी रुपयांची वाढ

भारतीय शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे मार्केट कॅपने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 470.49 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले आहे, जे मागील सत्रात 468.71 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 1.78 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.