Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद धावणार वंदे भारत; जाणून घ्या ट्रेनचा वेळ आणि तिकिटांचा दर
Saam TV September 17, 2024 03:45 AM

महाराष्ट्रामधून आज ३ नव्या वंदे भारत ट्रेन धावण्यास सुरूवात होणार आहे. नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी आणि कोल्हापूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल उपस्थित होते. मेक इन इंडिया अंतर्गत देशात 'वंदे भारत' ट्रेन धावत आहे. आता या ट्रेनचं जाळं सर्वत्र पसरलंय.

कोणत्या असणार ट्रेन काय असेल वेळ ?

आज पुणे ते हुबळी नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे या तीन मार्गांवर या नव्या वंदे भारत ट्रेन धावल्या आहेत.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचा वेळ घ्या जाणून

पुणे-हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक 20670 धावेल. ही पुणे-सांगली हुबळी वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारी, शनिवार, सोमवारी धावणार आहे. ही ट्रेन पुण्यातून दुपारी 2.15 वाजता निघेल. सांगलीत संध्याकाळी 6.10 ला पोहोचेल. बेळगावी रात्री 8.34 ला पोहोचेल. धारवडला रात्री 10.30 ला येईल. तर हुबळीत रात्री 10.45 ला पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी 20669 या क्रमांची ट्रेन हुबळी-सांगली-पुणे अशी धावेल. ही ट्रेन दर बुधवार, शुक्रवार, रविवारी हुबळीहून पहाटे 5 वाजता सुटेल. त्यानंतर ही ट्रेन धारवाडला पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी येईल. बेळगावात सकाळी 6.55 ला पोहोचेल. सांगलीला सकाळी 9.30 वाजता येईल. तर पुण्यात दुपारी 1.30 वाजता येईल.

नागपूर - सिकंदराबाद - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 20101 नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस(मंगळवार वगळता) नागपूर येथून 05.00 वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे त्याच दिवशी 12.15 वाजता पोहोचेल.(7 तास 15 मिनिट लागेल) ट्रेन क्रमांक 20102 सिकंदराबाद - नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद येथून 13.00 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 20.20 वाजता पोहोचेल

थांबे:

सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ. तर या वंदे भारत एक्सप्रेसला 20 डबे असणार आहेत. यातील 18 चेअर, 2 excutive डब्बे असतील.

Vande Bharat Train: एक दोन नव्हे आजपासून १० वंदे भारत ट्रेन! 'या' राज्यांमध्ये धावणार; जाणून घ्या मार्ग, वेळापत्रक अन् A TO Z माहिती कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा वेळ काय

कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा क्रमांक 20673 असेल. गुरुवारी शनिवारी सोमवारी ही गाडी धावणार आहे. कोल्हापूरहून सकाळी 8.15 ला निघेल. सांगलीत सकाळी 9.05 ला येईल. किर्लोस्करवाडीत 9.42 ला येईल. तर पुण्यात दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. तर परतीचा प्रवासासाठी गाडी 20674 असणार आहे. दर बुधवार शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. ही गाडी पुण्याहून दुपारी 2.15 वाजता निघणार आहे. किर्लोस्करवाडीत 5.50 ला येईल. सांगलीत संध्याकाळी 6.10 ला पोहोचेल. तर कोल्हापुरात रात्री 7.40 ला पोहोचणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.