Palak Paneer Dosa: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार पालक पनीर डोसा, सोपी आहे रेसिपी
esakal September 20, 2024 01:45 PM

साप्ताहिक सकाळ- मिना काळे

Palak Paneer Dosa Recipe: रोज एकाच प्रकरचा डोसा खाऊन बोरं झाले असाल तर पालक डोसाचा आस्वाद घेऊ शकता. हा पालक डोसा बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. पालकामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे पचन सुलभ ठेवण्यास मदत करते. हा डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.

पालक पनीर डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

दोन वाट्या तांदूळ पिठी

१ वाटी बारीक रवा

२ चमचे दही

अर्धी जुडी निवडलेला पालक

थोडी कोथिंबीर

२ हिरव्या मिरच्या

१०० ग्राम किसलेले पनीर

मीठ

तेल

Cutlet Recipe: सकाळी नाश्त्यात मुग, मटकीपासून बनवा बहुगुणी कटलेट, दिवसभर राहाल उत्साही पालक पनीर बनवण्याची कृती

पिठी, रवा दही व थोडे पाणी घालून ६-७ तास भिजवून ठेवावे. पालक मिरची आणि कोथिंबीर बारीक वाटून घ्यावी व भिजवलेल्या पिठात घालून आवश्यकतेनुसार पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून सपाट तव्यावर तेल घालून डोसे करावेत. डोसा तयार झाल्यावर निम्म्या भागावर पनीरचा कीस पसरून घडी घालावी.

चटणीचे साहित्य

एक चमचा जिरे

२ चमचे उडीद डाळ

अर्धा चमचा धने

१ कांदा

१ टोमॅटो

४ सुक्या लाल मिरच्या

तेल

मीठ आणि मोहरी

कृती

एक चमचा तेलावर धने जिरे व उडीद डाळ परतून घ्यावी, नंतर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर टोमॅटो घालून शिजवून घ्यावे. मीठ घालून थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटावे. आणि मोहरीची खमंग फोडणी घालावी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.