On This Day: अफगाणिस्तानचा 'करामती' खान! राशिदने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर IPL, BBL अन् CPL मध्येही घेतली हॅट्रिक
esakal September 20, 2024 01:45 PM

On This Day in Cricket: आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजीत एक नवी ओळख निर्माण करणारा खेळाडू म्हणजे राशिद खान. राशिदने टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. राशिद शुक्रवारी (२० सप्टेंबर) त्याचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

अफगाणिस्तानमध्ये २० सप्टेंबर १९९८ मध्ये जन्मलेला राशिद लहानपणी आभ्यासातही हुशार होता. त्याला डॉक्टरही बनायचे होते. पण क्रिकेटची आवड त्याला मैदानापर्यंत घेऊन आली. त्याने लहानवयातच क्रिकेटमध्ये मोठी प्रगती केली.

अवघ्या १७ व्या वर्षी त्याने अफगाणिस्तानसाठी वनडे पदार्पण केले. राशिदने त्याच्या कारकिर्दीत सुरुवातीपासूनच त्याच्या गोलंदाजीत किती प्रतिभा आहे, हे सिद्ध केलं. त्याला त्याची जागा बनवायला फार वेळ लागला नाही.

त्याच्या लेगस्पिनने तो टी२० क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू ठरला. चेंडू तो फार वळवत नाही, पण हवेबरोबर तो त्याच्या चेंडूला जी गती देतो, त्याचा फायदा त्याला मिळतो. गुगली हे त्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे.

Rashid Khan : दुसरी धाव नाकारली, कर्णधार राशिदने बॅटच फेकली... एवढंच नाही अफगाणिस्तान संघाचे अनेक Video होतायत ट्रेंड

त्याचबरोबर त्याच्याकडे गोलंदाजीतील विविधताही आहे. इतकेच नाही, तर तो बऱ्याचदा संघाला गरज पडेल तेव्हा आक्रमक फलंदाजीही करू शकतो. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे त्याला करामती खान टोपननावही पडलं आहे.

त्याच्या नावावर अनेक विक्रमही आहे. त्याने खेळलेल्या मोठ्या टी२० लीगमध्ये हॅट्रिक घेण्याचाही कारनामा केला आहे. त्याने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४ चेंडूत सलग ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी असा कारनामा करणारा तो मलिंगानंतरचा दुसराच खेळाडू होता.

इतकेच नाही, तर त्याने आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्यावेळी त्याने आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि शार्दुल ठाकूर यांना सलग तीन चेंडूवर बाद केले होते.

त्याने २०१७ साली कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतही गयाना ऍमेझॉन वॉरियर्ससाठी हॅट्रिक घेतली होती. त्याच्यानावावर बीबीएलमध्ये खेळतानाही हॅट्रिक आहे. त्याने २०२० मध्ये ऍडलेड स्ट्रायकर्ससाठी सिडनी सिक्सर्सविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. एकूणच राशिदने त्याची हॅट्रिक ही केवळ योगायोग नाही, तर त्याची प्रतिभा असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले आहे.

Rashid Khan: बंबई से आया मेरा दोस्त! IND-AFG सेमी-फायनलमध्ये पोहोचताच राशीदची मन जिंकणारी पोस्ट, एकदा बघाच

राशिदने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण केले, तो या संघासाठी ५ वर्षे खेळला. २०१७ मध्ये राशिद आयपीएल खेळणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर २०२२ मध्ये गुजरात टायटन्स संघात सामील झाला. त्याने सनरायझर्ससाठी ५ हंगामात तब्बल ९३ विकेट्स घेतल्या.

राशिद हा वनडेमध्ये गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा सर्वात युवा खएळाडू आहे, इतकेच नाही तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधारही आहे. त्याने सर्वात पहिल्यांदा २० वर्षे ३५० दिवस वय असताना बांगलादेशविरुद्ध ५ सप्टेंबर २०१९ रोजी कसोटीत नेतृत्व केले होते.

तो वनडेमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने ४४ सामन्यांत १०० विकेट्स पुर्ण केल्या होत्या. तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांत १०० विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ५३ सामन्यांतच १०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

राशिद एकाच कसोटीत १० विकेट्स आणि अर्धशतकही करणारा पहिलाच खेळाडू आहे.

Rashid Khan: 6,6,6,6,6,6; राशिद खानची तुफान फटकेबाजी, ट्वेंटी-२०त झळकावले वेगवान अर्धशतक, Video राशिदची कारकिर्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राशिदने ५ कसोटी सामन्यांत ३४ विकेट्स घेतल्या आहेत आणि १०६ धावा केल्या आहेत. त्याने १०४ वनडे सामन्यांमध्ये १८५ विकेट्स घेतल्या आहेत, तर १३१६ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ९३ सामन्यांमध्ये १५२ विकेट्स घेतल्या आहेत, तसेच ४६० धावा केल्या आहेत.

राशिदने आत्तापर्यंत ४४८ टी२० सामने खेळले असून ६१३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २५३७ धावाही केल्या आहेत. यामध्ये आयपीएलच्या १२१ सामन्यांचा समावेश आहे. त्याने १२१ आयपीएल सामन्यांमध्ये १४९ विकेट्स घेतल्या आहेत आणि ५४५ धावा केल्या आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.