Pune Firing: खानापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू, गावात पोलिस बंदोबस्त वाढवला
esakal September 20, 2024 01:45 PM

खडकवासला : सांबरेवाडी येथे शनिवारी ता.१४ रोजी मध्यरात्री दोन गटात गोळीबाराची घटना घडली होती. यातील जखमी सोमनाथ अनंता वाघ (वय २४, रा.खानापूर, ता.हवेली) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्याचा मृत्यू झाला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हवेली पोलीस स्टेशन यांनी माहिती दिली.

वाघ याच्या मृत्यूनंतर खानापूर गावात आणि परिसरात पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनेच्या वेळी सोमनाथ याच्यावर चेतन ऊर्फ दादया जावळकर याने दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या सोमनाथ याच्या छातीत घुसल्या होत्या. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. येथे त्याच्यावर उपचार सुरू होते.

याप्रकरणी हवेली पोलीसांनी चेतन ऊर्फ दादया जावळकर, यश ऊर्फ माम्या जावळकर, प्रवीण सांबरे यांना अटक केली असल्याची माहिती दिली. हवेली पोलिस ठाण्यातील घेरा सिंहगड गावाच्या हद्दीत दोन गटात शनिवारी हा प्रकार झाला होता. यामध्ये यापूर्वी रोहित ऊर्फ भोऱ्या ढिले व तेजस वाघ (दोघे ही रा.खानापूर, ता.हवेली) यांच्यात पूर्वीच्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून ही घटना घडली होती.

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

या घटनेत रोहित ऊर्फ भोऱ्या ढिले यास लोखंडी रॉड, कोयता या घातक हत्याराने अंगावर वार केले होते. यात रोहित याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिल्याने दोन्ही गटाच्या विरोधात हवेली पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तसेच यातील सहभागी तरुणांना अटक देखील केली आहे. 

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.