Blood Pressure : हे कंदमुळं ब्लड प्रेशर करत कंट्रोल
Marathi September 20, 2024 03:25 PM

उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर सध्या सर्वात गंभीर समस्या झाली आहे. हाय ब्लड प्रेशरची समस्या ह्दय, मूत्रपिंड आणि मेंदू यांवर परिणाम करणारी ठरू शकते. त्यामुळे या समस्येवर वेळतेच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत अनेक जण ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज औषधे घेतात. पण, औषधांव्यतिरिक्त तुम्ही काही सोपे उपाय सुद्धा करू शकता. जसे की, बीटाचे सेवन.

तज्ञांच्या मते, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी बीटाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. बीट एक कंदमुळ आहे, ज्याची चव गोडसर असते. बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बरेच जण बीट विविध गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने सकाळी सलाडमध्ये खातात. बीटाप्रमाणे बीटाचा रस फायदेशीर असतो. बऱ्याच जणांना याची चव आवडत नाही. पण, याचे फायदे ऐकून तुम्ही सुद्धा बीट खाण्यास सुरूवात कराल. त्यामुळे जाणून घेऊयात, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी बीट कसे फायदेशीर ठरू शकते.

रक्तदाबासाठी बीटचे फायदे –

बीटामध्ये नायट्रेट्स असतात, जे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरीत होतात. ज्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. परिणामी, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. जर अचानक ब्लड प्रेशर वाढले असेल तर बीटाच्या सेवनाने काही तासांतच ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकते. एका, संशाधनानूसार, जर काही आठवडे तुम्ही दिवसातून 2 बीट खाल्यास ब्लड प्रेशर सरासरी 5 मिलीमीटरपर्यत कमी होऊ शकते.

ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे –

  • चुकीची जीवनशैली
  • आहारात पोषणाची कमतरता
  • मद्यपान
  • लठ्ठपणा
  • जंक फूडचे अतिसेवन
  • ताणतणाव
  • धुम्रपान

ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी बीट कसे खावे?

बीटाचा रस –

ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही बीटाच्या रसाचे सेवन करू शकता. यात उच्च अॅटीऑक्सिडंट असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात तर राहतेच शिवाय लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

बीटाची पावडर –

तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या आहे आणि बीटाची चव तुम्हाला आवडत नसेल तर बीटाची पावडर हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही ज्युसमध्ये मिक्स करून खावू शकता. बीटाची पावडर व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबून करण्यासाठी उपयोगी ठरते.

बीटाचे सलाड –

अनेक जणांना सकाळी बीटाचे सलाड खाण्याची सवय असते. जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल तर तुम्ही बीट सलाड म्हणूनही खावू शकता.

याव्यतिरीक्त बीटाचे सेवन त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुम्हाला जर त्वचेच्या संबधित काही समस्या असतील तर बीटाचे सेवन करणे फायद्याचे ठरेल.

 

 

 

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.