Chhagan Bhujbal : नितेश राणेंची अजित पवारांनी तक्रार केल्याच्या विषयावर छगन भुजबळ म्हणाले….
GH News September 20, 2024 04:15 PM

भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतल्याच वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नितेश राणेंची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची चर्चा आहे. यावर नितेश राणे यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, असं म्हटलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना याबद्दल विचारण्यात आलं. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नाटकं येणार आहेत, त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “निवडणुकीचे निकाल लागत नाहीत, तो पर्यंत अनेक नाटक आपल्याला पहायला मिळतील”

अजितदादांनी नितेश राणेंची तक्रार केली, त्या विषयावर छगन भुजबळ म्हणाले की, ‘तक्रार केली की नाही, त्याबद्दल मला माहित नाही’ “मला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना एवढच सांगायच आहे की, महायुतीची मत वाढली पाहिजेत, यासाठी आपण बोलू. महायुतीची मतं वाढवता येत नसतील, तर आपल्या बोलण्याने परिणाम होऊ नये याची काळजी घ्यावी” असं छगन भुजबळ म्हणाले.

अजून काय म्हणाले छगन भुजबळ?

“महायुतीची सत्ता आली पाहिजे ही अजितदाद, नितेश राणे, नारायण राणे, माझी सगळ्यांचीच इच्छा आहे. आपण बोलताना विचार करुन बोललं पाहिजे. अनेक आमदार आहेत, त्यांना वेगवेळ्या समाजाचे लोक मतदान करतात. सरकार यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. सगळे आमदार चांगल्या मतांनी निवडून आले पाहिजेत. त्यांच्या मतांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी” असं छगन भुजबळ म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.