IND vs BAN 1st Test : Ravindra Jadeja काल होत्या तेवढ्याच धावांवर बाद झाला; शतकाची थोडक्यात हुलकावणी
esakal September 20, 2024 04:45 PM

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : भारतीय संघाला पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात मोठा धक्का बसला. आर अश्विन आणि Ravindra Jadeja या जोडीला तोडण्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना यश आले. सर जड्डूचे शतक थोडक्यात हुकले.

आर अश्विनच्या शतकाने आणि रवींद्र जडेजाने दिलेल्या सोबतीने भारत-बांगलादेशचा पहिला दिवस गाजवला. रोहित शर्मा ( ६), शुभमन गिल ( ०), विराट कोहली ( ६) यांच्या पटापट विकेट गेल्याने भारताची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली होती. यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांनी ९२ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. यशस्वीने ११८ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या, तर पंत ३९ धावांवर माघारी परतला.

IND vs ENG

लोकेश राहुल १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आर अश्विन व रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंनी डाव उभा केला. पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने ८० षटकात ६ बाद ३३९ धावा केल्या. या दोघांनी सातव्या विकेटसाठी २४० चेंडूंत १९९ धावा जोडून अनेक विक्रम मोडले. हिल्या दिवसाखेर अश्विन ११२ चेंडूत १०२ धावांवर नाबाद राहिला, तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर नाबाद राहिला होता

दुसऱ्या दिवसाचा खेळ झाला तेव्हा जडेजा एकही धावांची भर न घातला माघारी परतला. जड्डू १२४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या मदतीने ८६ धावांवर बाद झाला आणि अश्विनसोबत त्याची १९९ धावांची भागीदारी तुटली.

IND vs ENG अश्विनचे रेकॉर्ड्स...
  • कसोटीत एकाच मैदानावर ३ पेक्षा जास्त ५०+ धावा आणि ३०+ विकेट्स अशी कामगिरी असणारा अश्विन हा भारताचा दुसरा अष्टपैलू खेळाडू आहे.

  • कपिल देव यांनी चेन्नईत ४ अर्धशतकं, २ शतकं आणि ४० विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने चेन्नईतच २ अर्धशतकं, १ शतक आणि ३० विकेट्स घेतल्या आहेत.

  • अश्विनने आज ५८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याचे कसोटीतील दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. त्याने २०१२ मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५६ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.

  • आर अश्विन हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २० हून अधिक वेळा ५०+ धावा आणि ३० हून अधिकवेळा डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.