MSRTC : गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये ‘लालपरी’ मालामाल, 5 दिवसात ‘इतक्या’ कोटींची कमाई
GH News September 20, 2024 08:13 PM

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्यासाठी गणेशभक्तांना खासगी वाहनांचा प्रवास हा खिशाला परवणारा नसतो म्हणून ते लालपरीने प्रवास करणं पसंत करतात. गणेशोत्सवात सुखकर आणि परवडणाऱ्या प्रवासाच्या दृष्टीने गरीबरथ म्हणून चाकरमानी लालपरी अर्थात महामंडळाच्या एसटीचा प्रवास करत असतात. केवळ कोकणात जातानाच नाहीतर मुंबईत परतीचा प्रवास करतानाही चाकरमानी लालपरीनेच येताना दिसताय. गणेशोत्सव संपल्यानंतर परतीच्या फेऱ्यांमध्ये लालपरी अर्थात राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस मालामाल बनली आहे. अवघ्या 5 दिवसात तब्बल 3 कोटी होऊन अधिक उत्पन्न रत्नागिरीतील बस आगाराला मिळाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात लालपरीच्या परतीच्या फेऱ्यांमुळे रत्नागिरी विभागाला चांगला नफा झाला आहे. गणेशोत्सव आटपून मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांमुळे एसटी रत्नागिरी विभाग मालामाल झाला आहे. 12 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या चार दिवसात रत्नागिरीतून तब्बल 2 हजार 018 फेऱ्या मुंबईकडे सोडण्यात आल्या होत्या. यातून तब्बल 3 कोटी होऊन अधिक नफा एसटी विभागाला मिळाला असल्याने रत्नागिरीच्या लालपरीवर गणपती बाप्पाची कृपाच झाल्याचे म्हटले जात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.