SL vs NZ : कसोटीचा तिसऱ्या दिवशी श्रीलंकेकडे 202 धावांची सरशी, सामना कोण जिंकणार?
GH News September 20, 2024 11:09 PM

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गॅले आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु आहे. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्या डावात 305 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 340 धावा करत 35 धावांची आघाडी घेतली होती. 35 धावांची आघाडी मोडून विजयी धावा देण्याचं मोठं आव्हान श्रीलंकन संघासमोर होतं. पण दिमुथ करुणारत्नेच्या रुपाने पहिला धक्का बसला. संघाच्या अवघ्या 6 धावा असताना त्रिफळाचीत झाला. त्यामुळे श्रीलंकन संघ बॅकफूटवर गेला होता. मात्र पथुम निसंका आणि दिनेश चंडीमल यांनी डाव सावरला. दोघांनी मिळून 147 धावांची भागीदारी केली. दिमुथ करुणारत्ने 127 चेंडूत 83 धावा करून बाद झाला. तर दिनेश चंडीमल त्या पाठोपाठ 61 धावांवर तंबूत परतला. कामिंदू मेंडीस काही खास करू शकला नाही. त्याने 12 चेंडूत 13 धावा केल्या.

श्रीलंकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 4 गडी बाद 237 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडे 202 धावांची आघाडी असून शनिवारी किती धावा अजून जोडल्या जातात याची उत्सुकता आहे. दरम्यान, न्यूझीलंडकडू विल्यम ओरुरकेने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर एजाज पटेलने एक विकेट मिळवली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने न्यूझीलंडसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ 50 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेत विजय मिळवला तर अंतिम फेरीच्या शर्यतीत दावा आणखी पक्का होईल. त्यामुळे चौथ्या दिवशी श्रीलंका आणि न्यूझीलंड कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. या सामन्याचा निकाल लागणार हे मात्र निश्चित आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउदी (कर्णधार), एजाज पटेल, विल्यम ओरूरके.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.