AFG vs SA : रहमानुल्लाहचं शतक, रहमत-ओमरझईची अर्धशतकी खेळी, दक्षिण आफ्रिकेला 312 धावांचं आव्हान
GH News September 21, 2024 01:07 AM

अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 312 धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने 50 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरुबाज , अझमतुल्लाह ओमरझई आणि रहमत शाह या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनी छोटेखानी खेळी करत अफगाणिस्तानला 300 पार पोहचवण्यात योगदान दिलं. अफगाणिस्तान या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानचा बॉलिंग अटॅक हा तगडा आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका हे आव्हान पूर्ण करणार की अफगाणिस्तान मालिका जिंकणार? हे लवकरच स्पष्ट होईल.

अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरुबाज रहमानुल्लाह गुरुबाज याने शतकी खेळी केली. रियाझ हसन याने 45 बॉलमध्ये 29 रन्स केल्या. रहमानुल्लाहने 110 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. रहमत शाह याने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद नबी याने 13 धावांचं योगदान दिलं. तर अझमतुल्लाह ओमरझई आणि राशिद खान ही जोडी नाबाद परतली. अझमतुल्लाहने 50 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने नॉट आऊट 86 रन्स केल्या. तर राशिदने नाबाद 6 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, नांद्रे बर्गर, नकाबा पीटर आणि एडन मार्कर्म या चौघांनी 1-1 विकेट घेतली.

अफगाणिस्तान 300 पार

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, ब्योर्न फोर्टुइन, नांद्रे बर्गर, नकाबा पीटर आणि लुंगी एन्गिडी

अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रियाझ हसन, रहमत शाह, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर आणि फजलहक फारुकी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.