अशोक चव्हाण यांना धक्का, भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये, पक्षात येताच मविआबाबत मोठं वक्तव्य
Marathi September 20, 2024 11:25 PM

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे  मेहुणे भास्करराव खतगावकर (Bhaskarrao Khatgaonkar), त्यांच्या स्नुषा मीनलताई खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी माजी आ. डी.पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे हजर होते. काँग्रेसमध्ये प्रवेस केल्यानंतर भास्करराव खतगावकर यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं म्हटलं. खतगावकर यांचा काँग्रेस प्रवेश भाजप आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भास्करराव खतगावकर, मीनल खतगावकर यांचं काँग्रेसमध्ये स्वागत करत असल्याचं म्हटलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. लोकसभेत नांदेडमध्ये प्रत्येकाची ताकद दिसली आहे. खतगावकर यांच्या प्रवेशानं काँग्रेसला बळ मिळेल. नांदेडमध्ये कुणाची काय ताकद होती हे लोकसभेत दिसलं आहे, असंही नाना पटोले म्हणाले. नांदेड जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचा मोठा सोहळा पार पडेल, पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रवेशाचा मोठा सोहळा होईल, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.

नाना पटोले, भास्करराव खतगावकर हे भाजपामधून काँग्रेस पक्षात आले आहेत, त्यांचं स्वागत आहे. तसंच मीनल खतगावकर यांनीही पक्षात प्रवेश केला. आता भाजपा प्रणित शिंदे सरकारला गळती सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार स्पष्ट झालं असल्याचं नाना पटोले म्हणाले.भास्करराव खतगावकर यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम नांदेडला होणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. नांदेड येथे मेळावा घेतला जाईल आणि विधानसभा रणशिंग तिथून फुंकले जाईल, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.

अशोक चव्हाण स्वत: असुरक्षित आहेत, ते सध्या तिकडे आहेत, त्यांनी तिकडे कायम राहावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. भास्करराव खतगावकर यांनी नांदेडमध्ये तळागाळापासून काम केलेलं आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

बालाजी खतगावकर यांनी पक्षप्रवेशानंतर बोलताना काँग्रेसमध्ये आज प्रवेश केलेला असल्याचं सांगितलं. राहुल गांधी यांचे विचार मला पटतात, असंही ते म्हणाले. बालाजी खतगावकर यांनी  समाजामध्ये दोन भाग करण्याचं काम सत्ताधारी करत आहेत, असा आरोप केला. अशोक चव्हाण यांच्या येण्या-जाण्यामागे माझ्या प्रवेशाचे काही कारण नाही. ⁠ माझी काय ताकद आहे हे मला विचारण्यापेक्षा इतरांना विचारा ते सांगतील, असंही ते म्हणाले. ⁠ नांदेडच्या पोटनिवडणुकी संदर्भात पक्ष काय निर्णय घेईल तो मान्य असेल, असं बालाजी खतगावकर यांनी स्पष्ट केलं.

इतर बातम्या :

मोठी बातमी : नितेश राणेंवर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.