Mumbai university senate election postponed once again aab
Marathi September 21, 2024 10:25 PM


मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केले आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. (mumbai university senate election postponed once again)

विद्यापीठाच्या परिपत्रकात काय?

मुंबई विद्यापीठानं या निवडणुकीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कमल 28(2)(न) प्रमाणे नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणुकीची निवडणूक अधिसूचना 3 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक 22 सप्टेंबर 2024 रोजी होणार होती.

– Advertisement –

हेही वाचा – Siddharth Nagar : पत्राचाळीतील घरांच्या बांधकामाच्या निविदेला या कारणाने मुदतवाढ

या निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित मतदार, उमेदवार, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कळवण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार, 22 सप्टेंबर रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. (mumbai university senate election postponed once again)

– Advertisement –

सलग दुसऱ्यांदा सिनेटची ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी 10 सप्टेंबरला सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होतं. मात्र, तेव्हाही अचानक ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठानं जाहीर केला. त्यावर विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने यासंदर्भात 17 ऑगस्टला विद्यापीठाला पत्र दिलं. या पत्रानंतर विद्यापीठानं ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा – Mega Block : रविवारी लोकलच्या वेगाला लागणार ब्रेक; मध्य-हार्बर मार्गावर या काळात मेगाब्लॉक


Edited by : Ashwini A. Bhatavdekar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.