जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत वाय वाय सी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थांची यशस्वी कामगिरी
esakal September 21, 2024 10:45 PM

कुस्ती स्पर्धेत वाय.वाय.सी. स्कूलचे यश
वाडा : अस्पी विद्यालय उचाट याठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये वाय.वाय.सी. इंग्लिश स्कूल, कुडूस विद्यार्थ्यांनी १४ गोल्ड मेडल आणि सात सिल्व्हर मेडल जिंकले. जिल्हा क्रीडा अधिकारी अमृत घाडगे, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक प्रीतीश पाटील, वाडा तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत पारगावकर, तलासरी तालुका क्रीडा अधिकारी मारुती थोरात, अस्पी हायस्कूल उचाटचे प्राचार्य अनिल भोईर, वाय.वाय.सी. इंग्लिश स्कूलचे चेअरमन मिलिंद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थांना मेडल प्रदान करण्यात आली. विद्यार्थांना वाय.वाय.सी. स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक संभाजी घोडविंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.