शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी प्रकाश केणे तर तालुकाप्रमुख निलेश पाटील यांची नियुक्ती
esakal September 21, 2024 10:45 PM

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी प्रकाश केणे
वाडा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी प्रकाश केणे यांची तर तालुकाप्रमुखपदी नीलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकाश केणे त्यांनी नगरसेवक, तालुका समन्वयक, उपशहरप्रमुख, शहरप्रमुख अशा विविध पदांवर काम केले आहे. नीलेश पाटील यांनी वॉर्ड प्रमुख, उपशहरप्रमुख, तालुका सचिव, ग्रामपंचायत सदस्य अशा विविध पदांवर काम केले आहे. या निवडीबद्दल शिवसैनिकांनी दोघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्याचा संकल्प या दोघांनी बोलून दाखवला आहे.
फोटो
प्रकाश केणे, नीलेश पाटील

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.