सरस्वती व्याख्यानमाला अध्यक्षपदी म्हाळसकर
esakal September 22, 2024 12:45 AM

सरस्वती व्याख्यानमाला
अध्यक्षपदी म्हाळसकर
वडगाव मावळ, ता.२१ : मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला २०२४ च्या अध्यक्षपदी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. मावळ विचार मंचाच्या वतीने वडगाव येथे गेल्या २४ वर्षांपासून नवरात्रीमध्ये सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे. आत्तापर्यंत राज्य पातळीवरील अनेक नामवंत वक्त्यांनी या व्याख्यानमालेत हजेरी लावली आहे. यंदा ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.