‘मी त्याला पहिले शतक करताना पाहिले’, पंतच्या जोडीदाराने एका ओळीत सांगितली पुनरागमनाची कहाणी
Marathi September 22, 2024 03:24 AM

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी गाजवला. दोघांनीही शतकी खेळी केल्या आहेत. आता गिलने पंतच्या शतकी खेळीचे कौतुक केले आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेत गिल म्हणाला की, पंत खूप मेहनती आहे.  त्याला पुनरागमनानंतर पहिले अर्धशतक आणि नंतर शतक करताना पाहून खूप आनंद झाल्याचेही त्याने सांगितले.

कार अपघातानंतर जवळपास दीड वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना पंतने चमकदार खेळी केली. पंतने 128 चेंडूंचा सामना करताना 109 धावा केल्या. या डावात त्याने 13 चौकार आणि 4 षटकार ठोकले. पंत आणि गिल यांनी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. या शानदार भागीदारीनंतर गिलने पंतचे कौतुक केले.

‘पंत खूप मेहनत करतात’
गिल म्हणाला, मी पंतसोबत मैदानाच्या बाहेर आणि मैदानावर बराच वेळ घालवला आहे. मी दुसऱ्या टोकावरुन पुनरागमनानंतर पंतला पहिले अर्धशतक आणि या अर्धशतकाला पहिल्या शतकात बदलताना पाहिले आहे. तो किती मेहनत घेत आहे हे पाहून मला आनंद झाला. आपल्या सर्वांना हे माहित आहे की त्याचा अपघात झाल्यानंतर तो मैदानावर परतला आहे. तो कठोर परिश्रम करीत आहे. मला वाटते की, दमदार प्रदर्शन करताना पाहून पंतला स्वत:लाही आनंद होत असेल.

भारताने 515 धावांचे लक्ष्य दिले आहे
भारत विरुद्ध बांगलादेश संघातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने दुसर्‍या डावात चार विकेट्स गमावत 287 ​​धावा केल्या आणि डाव घोषित केला. गिल आणि पंतने शतकी योगदान दिले. अशाप्रकारे भारताने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य दिले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर संपवण्यात आला. बांगलादेशने दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेटच्या नुकसानावर 158 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

रिषभ पंतच्या चेन्नई कसोटीतील शतकी खेळीनंतर प्रेयसीची रिऍक्शन व्हायरल
आधी नाबाद, मग बाद आणि पुन्हा नाबाद; पंचांच्या निर्णयामुळे भर सामन्यात उडाला गोंधळ
VIDEO: रूतुराज गायकवाड बनला ‘सुपरमॅन’ पकडला अप्रतिम झेल


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.