Team India: श्रेयस अय्यर स्वत:च कापतोय परतीचे दोर! फलंदाजाकडून पुन्हा तीच चूक
GH News September 22, 2024 01:08 AM

टीम इंडिया सध्या मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर टीम इंडिया पुढील काही महिने विविध संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. अशात युवा खेळाडू हे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील अखेरच्या टप्प्यातील सामन्यात चमकदार कामगिरी करुन भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच काही खेळाडू हे पुनरागमनासाठी जीवतोड प्रयत्न करत आहेत. अशात दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर स्वत:च परतीचे दोर कापतोय, असं त्याच्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरीवरुन दिसून येतंय. श्रेयसला दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे श्रेयसला बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या-अंतिम सामन्यासाठी आणि न्यूझीलंड विरूद्धच्या मायदेशातील टेस्ट सीरिजमध्ये संधी मिळण्याची शक्यताही कमी असल्याचं म्हटलं जात आहे.

इंडिया बी विरुद्ध इंडिया डी यांच्यात दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा सामना खेळवण्यात येत आहे. इंडिया डी संघाचा कर्णधार असलेल्या श्रेयसला सामन्यातील पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. मात्र श्रेयसने दुसर्‍या डावात अर्धशतकी खेळी करत कमबॅक केलं. मात्र भारतीय संघात श्रेयसला स्थान मिळवायचं असेल, तर त्याला अशीच सातत्याने खेळी करावी लागेल, मात्र आता ती वेळ निघून गेली आहे. श्रेयसला या संपूर्ण स्पर्धेत काही डावांचा अपवाद वगळता काही खास करण्यात यश आलं नाही.

श्रेयसने दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील तिन्ही फेरीतील सामने खेळले. श्रेयसला या 3 सामन्यांमधील 6 डावांमध्ये एकदाही शतक करता आलं नाही. श्रेयसने 6 डावांमध्ये 25.66 च्या सरासरीने अवघ्या 154 धावा केल्या. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच नाही, तर श्रेयस 2 वेळा भोपळा न फोडता माघारी परतला.

सामन्याबाबत थोडक्यात

इंडिया डी संघाने पहिल्या डावात 349 धावा केल्या. इंडिया बी संघाला प्रत्युत्तरात 282 धावांपर्यंतच पोहचता आलं. वॉशिंग्टन सुंदरने 140 चेंडूत 1 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. त्यामुळे इंडिया डी संघाल पहिल्या डावात 67 धावांची आघाडी मिळाली. इंडिया डी संघाने या आघाडीच्या जोरावर दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 244 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंडिय डी कडे 311 धावांची आघाडी आहे.

इंडिया बी प्लेइंग ईलेव्हन : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), एन जगदीसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, मुशीर खान, सुयश प्रभुदेसाई, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, राहुल चहर, नवदीप सैनी, मोहित अवस्थी आणि मुकेश कुमार.

इंडिया डी प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅटन), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिकी भुई, सरांश जैन, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, निशांत सिंधू आणि आकाश सेनगुप्ता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.