आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 सप्टेंबर 2024
esakal September 22, 2024 11:45 AM

पंचांग -

रविवार : भाद्रपद कृष्ण ५, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.२९, चंद्रोदय रात्री ९.५२, चंद्रास्त सकाळी १०.३५, पंचमा-षष्ठी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद ३१ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००० - प्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ‘प्रिमिओ स्पेसिएल पर ला रेजिआ’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

  • २०१४ - आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या सांघिक २५ मीटर पिस्तूल नेमबाजी प्रकारात राही सरनोबत, अनिसा सय्यद, हीना सिद्धू या खेळाडूंनी सांघिक कांस्यपदक पटकाविले.

  • २०१४ - भारताच्या मंगळ मोहिमेत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. गेले ३०० दिवस निद्रावस्थेत असलेले मंगळयानावरील इंजिन यशस्वीरीत्या प्रज्वलित केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.