Marathi kavita : विसरलोय मी!
esakal September 22, 2024 11:45 AM

- सागर लांडगे, पुणे

विसरलोय मी

तिची न् माझी पहिली भेट

विसरलोय मी

जी मनात बसली होती एकदम थेट

विसरलोय मी

तिचा त्या दिवशीचा अबोली ड्रेस

विसरलोय मी

तेव्हा तिचे वाऱ्यावर उडणारे केस

विसरलोय मी

मन घायाळ करणारा तिचा कटाक्ष

विसरलोय मी

तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष

विसरलोय मी

तिचं चिडून मला ‘खडूस’ म्हणणं

विसरलोय मी

लटक्या रागातसुद्धा प्रेमानं काळजी घेणं

विसरलोय मी

दोघांनी घेतलेला चहाचा वाफाळता कप

विसरलोय मी

तिनं दिलेलं चाफ्याचं रोप

विसरलोय मी

मला सतावण्यासाठी तिचं मुद्दाम अबोल राहणं

विसरलोय मी

बोलता बोलता मला निःशब्द करणं

विसरलोय मी

आमच्यातलं भांडण, मैत्रीचं...प्रेमाचं बोलणं

आणि

विसरलोय मी

तिने मला ‘मला विसर’ म्हणणं!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.