Investment Plan : 4000 रुपयांची गुंतवणूक करा, 2.5 कोटी रुपये मिळवा, काय आहे करोडपती होण्याचा फॉर्म्युला
एबीपी माझा वेब टीम September 22, 2024 02:13 PM

Investment Plan : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्वं वाढत आहे. कारण भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं गरजेचं आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात गुंतवणुकीच्या विविध योजना सुरु झाल्या आहेत. या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतो. तुम्हाला जर कमी काळात करोडपती व्हायचं असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपी (Mutual Funds SIP) करु शकता. योग्य गुंतवणूक आणि योग्य नियोजनाद्वारे तुम्ही करोडपती होऊ शकता. 

महिन्याला 4000 रुपयांची गुंतवणूक

तुम्ही जर महिन्याला 4000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता. समजा तुम्ही जर वयाच्या 25 व्या वर्षापासून महिना 4000 रुपये गुंतवणुकीला सुरुवात केली. तर 60 व्या वर्षी तुम्ही 2.5 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक असाल. एसआयपीच्या माध्यमातून करोडपती होण्याची तुम्हाला मोठी संधी आहे. 25 व्या वर्षीपासून तुमचे 39.6 लाख जमा होतील आणि तुम्हाला परताव्यासह 2.5 कोटी रुपये मिळतील. त्यामुळं तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. 

12 टक्क्यांचा परतावा 

तुम्हाला जर 25 व्या वर्षापासून गुंतवणूक नाही करता आली तर तुम्ही 30 व्या वर्षापासून देखील गुंतवणुकीला सुरुवात करु शकता. तुम्ही 30 व्या वर्षापासून महिना 7200 रुपये जमा केले तर 60 व्या वर्षी तुम्ही करोडपती व्हाल. 60 व्या वर्षी तुम्हाला 2.5 कोटी मिळतील. समजा तुम्ही 35 व्या वर्षापासून 13200 रुपयांची एसआयपी सुरु केली तर 60 व्या वर्षी तुम्ही 2.5 कोटी रुपयांचे मालक व्हाल. या एसआयपी मध्ये तुम्हाला 12 टक्क्यांचा परतावा मिळतो. त्यामुळं तुम्हाला करोडपती होणं शक्य होतं. 

SIP चे काम कसे चालते?

एसआयपी म्हणजे Systematic Investment Plan हा गुंतवणुकीचा प्रकार आजघडीला चांगलाच प्रसिद्ध आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संघ्या दिवसेंदिवस वाढत आहेत.  SIP एक Recurring Investment प्रमाणे काम करेत. यात तुमच्या बँक खात्यातून प्रत्येक महिन्याला तुम्ही ठरवून दिलेले पैसे कट होतात. हे पैसे तुम्ही निवडलेल्या म्युच्यूअल फंडात गुंतवले जातात. तुमचे पैसे एखाद्या फंडात गुंतवले गेल्यास त्याच्या बदल्यात तुम्हाला संबंधित फंडाचे काही यूनिट्स मिळतात. तुमच्या फंडाची त्या दिवशी नेट असेट व्हॅल्यू किती आहे? यावरून तुम्ही गुंतवलेल्या पैशांच्या बदलात तुम्हाला किती यूनिट्स मिळणार हे ठरवले जाते. यातून गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतो. 

एसआयपी नेमकं काम कसं करते? हजारोंचे लाखो रुपये कसे होतात? जाणून घ्या A टू Z माहिती

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.