बाईईई... हा काय प्रकार! प्राणीसंग्रहालयाने कुत्र्यांना पांड्यासारखं रंगवल्याची विचित्र घटना, VIDEO पाहून तुम्हीच ठरवा
नामदेव जगताप September 22, 2024 03:13 PM

Trending News : भारत आणि चीनचा सीमासंघर्ष सर्वज्ञात आहे. चीन सीमेवर अनेक वेळा नियम मोडत कुटनितीचा वापर करताना पाहायला मिळतो. अनेक वेळा सीमेवरील नियम मोडत चीन फसवेगिरी करतो. चीन इतर देशांसोबत तर फसवेगिरी करतोच, शिवाय चिनी नागरिकांसोबतही फसवेगिरीचा प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत चीन फक्त नकली सामानासाठी ओळखलं जायचं, पण आता चीनने प्राण्यांच्या नावाखालीही फसवेगिरी सुरु केली आहे.

प्राणीसंग्रहालयाने कुत्र्यांना पांड्यासारखं रंगवल्याचा विचित्र प्रकार

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चीनने कुत्र्यांचं पांडामध्ये रूपांतर करून त्यांना पर्यटकांना दाखवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.  चीनच्या प्राणीसंग्रहायलामध्ये कुत्र्यांना बनावट पांडा बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओ नीट पाहिल्यास तुम्हाला समजेल की नक्की काय घडलंय. व्हायरल व्हिडीओमध्ये काळा-पांढऱ्या रंगाचे प्राणी पांडा असल्याचं पहिल्या क्षणी वाटत आहेत, पण तुम्ही नीट पाहिल्यास तुम्हाला कळेल की यामध्ये काहीतरी गडबड आहे. 

कुत्र्यांच्या पिल्लांना पांडा बनवलं

चीनच्या शानवेई प्राणीसंग्रहालयातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्राणीसंग्रहालयात येणारे प्रत्येकजण विचार करत होता की हे प्राणी पांडा आहेत, पण हा पांडा नाही. खरं तर ही कुत्र्याची पिल्ले आहेत, ज्यांना प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी पांढरे आणि काळ्या रंगाने रंगवले आणि त्यांना पांडा बनवलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. कुत्र्यांच्या पिल्लांना पांडा बनवल्याचं लक्षात येताच चिनी नागरिकांचा संताप अनावर झाला. 

VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

कसा उघडकीस आला प्रकार?

नेटकरी याची खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहेत. काही नेटकरी सांगत आहेत की, हे पांडे चीनने वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केले आहेत. प्राणीसंग्रहालयात पांडासारखा दिसणार प्राणी अचानक भुंकू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. 

प्राणिसंग्रहालय प्रशासनाने काय म्हटलं?

या प्रकरणाबाबत प्राणिसंग्रहालय प्रशासनाने म्हटलं आहे की, आमच्याकडे दोन लठ्ठ ताजे चाऊ-चाऊ कुत्रे होते. ज्यांना आम्ही पांडासारखं दिसण्यासाठी पेंट केलं. जास्तीत जास्त लोक पांडा बघायला यावेत म्हणून असं केल्याचं प्राणीसंग्रहालयाने म्हटलं आहे. मात्र, प्राणीसंग्रहालय प्रशासनाने नागरिकांसोबत फसवणूक केल्याचा मान्य केलेलं नसलं तरी इन्कारही केला नाही.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.