कागलमध्ये ईडी आल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते, महिला बाहेर आली होती; सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
नाजिम मुल्ला, एबीपी माझा September 22, 2024 04:43 PM

पुणे : एखादी व्यक्ती बोलल्यानंतर डोळ्यात चटचट पाणी आणणाऱ्या आम्ही महिला आहोत. मात्र, जेव्हा घात होतो तेव्हा अश्रू बाजूला करून पदर खेचून लढण्याची शक्ती राज्यातील प्रत्येक महिलेमध्ये आहे. जेव्हा कागलमध्ये ईडी आले होते, तेव्हा घरातील पुरुष मागे बसले होते आणि महिला पुढे येऊन म्हणाली मी माझ्या घरात घुसू देणार नाही. मी टीव्हीवर ही घटना पाहिली. माझ्या मुलांचं दूध आलेलं नाही, तुम्ही बाहेर थांबा. आधी दूधवाला येईल, आमच्या मुलांची, नातवंडाची पोट भरेल आणि मग ईडी आत येईल म्हणाली. याला महिला म्हणतात. ही आमची ताकद असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती प्रहार केला. 

समरजितसिंह घाटगे यांच्याकडून मेळावा आयोजित

पिंपरी चिंचवडमधील चिंचवडे लॉन्समध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांनी मेळावा आयोजित केला होता. कागल, गडहिंग्लज, उत्तुर भागातील बांधवांसाठी कौटुंबिक स्नेहमेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, समरजितसिंह घाटगे यांनी संबोधित केले. आगामी विधानसभा लढत घाटगे विरुद्ध समरजित घाटगे अशीच होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील कामानिमित्त विखुरलेल्या बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी दोघांकडून चांगलीच चुरस सुरु आहे. यावेळी मोठ्या संख्येने कागल विधानसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असणारे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उद्याचा दिवस बदलण्याची ताकत समरजितसिंह घाटगे यांच्याकडे

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, अनेकवेळा कागल मतदारसंघाला पवार साहेबांनी लाल दिवा दिला आहे. उद्याचा दिवस बदलयांची ताकत समरजितसिंह घाटगे यांच्याकडे आहे. नेते गेले आणि कार्यकर्ते राहिले हे अनेक जण बोलले. मात्र, नेते  जनतेने बनवले होते. पवार साहेब मला दौऱ्यामध्ये विचारायचे कोण होत दौऱ्यात? तर मी आमदार, जिल्हा परिषदवाले होते असे सांगत होतो. तेव्हा पवार साहेबांनी सांगितले की सामान्य माणसाशी नाळ ठेव. राजकारण आणि समाजकारण करायचे असेल, तर जनता हाच केंद्रबिंदू आहे. मोठं करायचे काम जाणताच ठरवते आणि घरी बसवायचे कामही जनता करते. मोडेल पण वाकणार नाही अशा माणसाला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

पिंपरी चिंचवडचा कारभारी वेगळा होता

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड  भागात पाच दशकांचे ऋणानुबंध आहेत. मी इतके वर्ष आले नाही कारण कारभारी वेगळा होता. कधी कोणाच्या कामात ढवळढवळ करू नये म्हणून मला बोलावून सुधा केव्हा आले नाही.मुंबईला जाताना अनेकवेळा पिंपरी चिंचवडमधूच जाते, पण केव्हा थांबले नाही. पिंपरी चिंचवडचा कारभारी वेगळा होता, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला. नवीन पिढी पुढे आली पाहिजे, मलाही त्याचा विचार करावा लागेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.