Navratri Fashion Trend : नवरात्रीला चारचौघीत उठून दिसायचंय तर या अभिनेत्रींपासून घ्या टिप्स, दिसाल ट्रेंडी अन् फॅशनेबल
esakal September 22, 2024 04:45 PM
Navratri Fashion Trend :

गौरी-गणपतीचा सण पार पडला आहे. आता सर्वांनाच नवरात्रौत्सवाची उत्सुकता लागली आहे. लवकरच घटस्थापना होणार असून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होणार आहे. तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने दांडिया नाईटमध्ये सहभागी होत असाल, तर तुम्ही अभिनेत्रींच्या लेहेंगा लूकवरून आउटफिट आयडिया घेऊ शकता.

दांडिया नाईट्समध्ये  अनेक वेगवेगळ्या स्पर्धाही घेतल्याय जातात. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तरूणी उत्सुक असतात. तुम्हीही यंदाच्या दांडिया नाईट्सला स्पर्धेत भाग घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

तुम्ही टिपिकल राजस्थानी, मारवाडी फॅशनचा लेहंगा घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रींचे काही लेहेंगा लूक्सबद्दल सांगणार आहोत. या लूकवरून तुम्हाला दांडियामध्ये कसा ड्रेसअप करायचा याच्या काही टिप्स मिळतील.

Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्र 3 की ४ ऑक्टोबरला? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त फ्लोरल प्रिंट लेहंगा

नवरात्रीला स्टायलिश लुक मिळवण्यासाठी तुम्ही असा फ्लोरल प्रिंट लेहेंगा निवडू शकता. या प्रकारच्या फ्लोरल प्रिंट लेहेंग्यात तुम्ही सुंदर दिसाल तर तुमचा लुकही वेगळा दिसेल. या लेहेंग्यावर अतिशय सुंदर फ्लोरल प्रिंट असून त्यावर एम्ब्रॉयडरीही केली आहे.

हेवी वर्क असलेल्या लेहंग्यांपेक्षा तरूणींमध्ये सध्या हलक्या-फुलक्या लेहंग्याची क्रेझ वाढली आहे. जे आरामदायक वाटतात आणि दिसायलाही रिच दिसतात.

फ्लोरल प्रिंट लेहंगा Navratri Festival 2023: मनातील अशा पूर्ण करणारी नरकोळची आशापुरी! जरी वर्क लेहंगा

सारा अली खानप्रमाणे, तुम्हीही नवरात्रीच्या निमित्ताने या प्रकारचा जरी वर्क लेहेंगा निवडू शकता. या लेहेंग्यात खूप सुंदर जरदोजी आणि जरी वर्क आहे. हा लेहेंगा तुम्हाला बाजारात सहज मिळू शकतो आणि तुम्ही डिझायनरच्या मदतीने ते मिरर वर्क ज्वेलरी किंवा चोकरने स्टाईल देखील करू शकता.

Navratri 2023 : नऊ दिवसांच्या उपवासानंतर लगेच या 5 गोष्टी खाऊ नका, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
एम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगा

नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही हा एम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगा स्टाईल देखील करू शकता आणि या प्रकारच्या लेहेंग्यात तुम्ही गर्दीपेक्षा वेगळे दिसाल. तुम्हाला हा लेहेंगा बाजारात सहज मिळू शकतो आणि तुम्ही डिझायनरच्या मदतीने ते डिझाईन देखील मिळवू शकता.

एम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगा Navratri 2023: ‘आग्या हो विसरग्या हो’चा गावागावांत गजर! शारदीय नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त चक्रपूजा पैठणी साडी लेहंगा

तुम्हाला वेस्टर्न अन् टिपिकल गुजराती वर्क असलेला लेहंगा नकोसा असेल तर तुम्हाला हा लेहंगा नक्की आवडेल. पैठणी साड्यांची क्रेझ तर बॉलिवूडलाही आहे. तुम्हीही पैठणी काठ असलेला हा शोभिवंत अन् ट्रेंडी लेहंगा ट्राय करू शकता.  

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.