भयंकर अपघातातून वाचला अन् मेहनतीने केले पुनरागमन; Rishabh pant बद्दल काय म्हणाला Shubman Gill ?
esakal September 22, 2024 04:45 PM

Shubman Gill reacts on Rishabh pant century : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात रिषभ पंतने शतक झळकावले. त्यामागोमाग शुभमन गिलनेही ११९ धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान दोघांनीही चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली.

रिषभ पंतच्या या धमाकेदार खेळीवर शुभमन गिलने, "केवळ दैव बलवत्तर म्हणून भयंकर अपघातातून वाचलेल्या रिषभ पंतने पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर येण्यासाठी घेतलेल्या अनन्यसाधारण मेहनतीचे आज चिज झाले." अशा भावना व्यक्त केल्या आहे.

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

"रिषभ पंत आणि मी मैदानावरच काय; पण मैदानाबाहेरही बराच काळ एकत्र घालवला आहे. त्याने पुनरागमन करायला काय प्रचंड कष्ट केले आहेत याची मला कल्पना आहे, म्हणून चेन्नई कसोटीत त्याने केलेले पुनरागमन आणि आजचे शतक लक्षात राहणार आहे. त्यालाही आजच्या खेळीदरम्यान काय चैतन्य जाणवत होते, याचा अंदाज मला ,येत होता. दोन चेंडूंमध्ये आम्ही भेटायचो तेव्हा रिषभ मूठ आवळून मला पंच करीत होता आणि बॅटने टकाकट मला माझ्या बॅटवर मारत होता. मला माझ्या बॅटची काळजी वाटू लागली होती." असे गिलने हसत हसत सांगितले.

"तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाला, रिषभ पंतबरोबर फलंदाजी करताना मी स्वत:ला बजावतो की तू तूझ्या शैलीत खेळ. पहिल्या डावातील अपयशानंतर मला करता आलेल्या शतकाचा आनंद जास्त आहे. बऱ्याच लोकांना मला चालू मोसम माझ्यासाठी सर्वोत्तम फलंदाजीचा वाटत असला तरी मी खात्रीने सांगू शकतो की माझ्यातील सर्वोत्तम फलंदाजी अजून बाहेर यायची आहे. मला वाटते की अजूनही चेपॉकची खेळपट्टी फलंदाजीला चांगली आहे; पण आता मधूनच काही चेंडू वळत आहेत, उडत आहेत. त्याचा फायदा घेण्याची क्षमता भारतीय गोलंदाजांच्यात आहे." असे भारताच्या विजयाविषयी खात्री देताना गिल म्हणाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.