अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार, 'अरबाज की निक्की' घराबाहेर कोण जाणार?
जयदीप मेढे September 22, 2024 07:43 PM

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) या आठवड्यात वाईल्ड कार्ड एन्ट्री संग्रमा चौघुलेला वैद्यकीय कारणामुळे घराबाहेर पडावं लागलं. त्यामुळे घरातील एका सदस्याचा खेळ संपला. पण असं असलं तरीही या आठवड्यातील नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान यामध्ये अरबाज (Arbaz Patel) आणि निक्की (Nikki Tamboli) हे दोघेही डेंजर झोनमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. 

कलर्स मराठीकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्की हे डेंजरझोनमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. अरबाज आणि निक्की या दोघांचंही घरातलं वागणं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना आवडत नसल्याचं चित्र होतं. त्यामुळे वारंवार या दोघांनाही घराबाहेर काढण्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती. आता या दोघांपैकी नक्की घराबाहेर कोणं पडलं आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

कलर्स मराठीकडून प्रोमो शेअर

बिग बॉसकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस घरातल्या स्पर्धकांना सांगतात की, आता वेळ आली आहे, एलिमिनिनेशनची.त्यामध्ये घरातल्या सदस्यांसमोर बॅग ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये सेफची पाटी ठेवण्यात आलेली आहे आणि एका स्पर्धकाला दुसऱ्या सदस्याची बॅग उघडायची आहे. यामध्ये जान्हवी, सूरज आणि वर्षाताई हे सदस्य सेफ होतात. त्याचप्रमाणे निक्की आणि अरबाज हे डेंजर झोनमध्ये जातात. जेव्हा बिग बॉस निर्णय सांगतात, तेव्हा निक्की अरबाजच्या गळ्यात पडून रडते. त्यामुळे आता या दोघांपैकी कुणाचा खेळ संपणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. 

अरबाजबद्दल प्रेक्षकांचा नाराजीचा सूर

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, "अरबाज आणि निक्कीला सोडून वोटींग करा". दुसऱ्याने म्हटलं, "अरबाजला काढा, निक्की वीक होईल, एकटी पडेल, तिची मनमानी पण चालणार नाही". आणखी एकाने लिहिलंय,  "भावांनो आपल्याला अरबाजला बाहेर काढायचं आहे सुरज, वर्षा ताई, जान्हवी यांना वोट करा". अरबाज वोटींगमध्ये सगळ्यात शेवटी आहे, पण बिग बॉस त्याला बाहेर काढणार नाहीत. वोटींग फक्त नावाला घेतात. करतात तेच जे बिग बॉसला वाटतं, बघू यावेळी काय करतायेत", असं म्हणत एका नेटकऱ्याने शंका व्यक्त केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : अरबाज घराबाहेर जाणार की कॅप्टन्सी तारणार? भाऊच्या धक्क्याकडे प्रेक्षकांचं लक्ष

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.