वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला
Webdunia Marathi September 22, 2024 09:45 PM

सापाचं नाव जरी आले तरीही अंगाचा थरकाप उडतो. समोर आल्यावर घबराहट होते. वाशिमच्या एका सरकारी रुग्णालयात एक किंग कोब्रा चक्क डॉक्टरांच्या केबिन मध्ये शिरून बसला. हा विषारी साप औषधांच्या रॅक मध्ये शिरून बसला होता. सापाला बघून गोंधळ उडाला

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या शेलूबाजार जवळील हिरंगी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टरांच्या केबिन मध्ये औषधांच्या रॅक मध्ये विषारी किंग कोब्रा बसला होता. हे पाहता नागरिकांमध्ये गोंधळ उडाला.


हेल्पिंग हँड वाइल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लबला देण्यात आली क्लबचे सदस्य आदित्य इंगोले घटनास्थळी पोहोचले त्यांना औषधाच्या रॅक मध्ये 3.5 फूट लांब किंग कोब्रा आढळून आला. सर्पप्रेमी आणि वन्यजीव रक्षक असलेल्या आदित्यने तज्ज्ञतेने साप पकडला. यानंतर वनविभागाला माहिती देऊन या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.