Atishi Marlena : दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
Sarkarnama September 22, 2024 10:45 PM

Atishi Marlena News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर अतिशी यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय 'आप'ने घेतला होता. आज (ता.21) अतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुषमा स्वराज, शीला दिक्षित यांच्यानंतर अतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या.

आतिशी यांच्यासोबत सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत आणि इम्रान हुसैन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुकेश अहलावत हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळात मुकेश अहलावत हा एकमेव नवा चेहरा आहे.

दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री

आतिशी यांनी केजरीवाल यांचा दिल्लीचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते.मोडला आहे. आतिशी 43 वर्षांचे आहेत, तर केजरीवाल 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा 45 वर्षांचे होते. आतिशी यांच्या शपथविधी सोहळ्याला आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि पंजाबचे

Mushrif vs Ghatage : कागलचा सामना मैदानाबाहेरही रंगणार, घाटगे अन् मुश्रीफांनी थोपटले दंड केजरीवालांना जामीन

अरविंद केजरीवाल यांनी कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी तुरुंगावास झाला होता. त्यांना नुकताच जामीन मिळाला. मात्र, जामीन देताना त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जात येणार नाही तसेच मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेता येणार नाही, अशा सूचना केली होती. केजरीवाल यांनी 17 सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Kumari Selja: हरियाणात 'खेला' होणार! ; काँग्रेसच्या कुमारी शैलजा भाजपमध्ये प्रवेश करणार?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.