पितृपक्षातच का दिल्या जातात विविध वस्तु खरेदीवर आकर्षक ऑफर?
Times Now Marathi September 23, 2024 08:45 AM

Retailer Offer Big Discount in Pitru Paksha: सध्या पितृपक्ष सुरू असून, हिंदू धर्मात याला खूप महत्व आहे. असे मानले जाते की या काळात आपल्या पूर्वजांचे आत्मा पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा, हवन, दान, पिंडदान, श्राद्ध इत्यादी अनेक धार्मिक कार्ये करतात. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे जो 25 सप्टेंबर 2022 पर्यंत चालणार आहे. पण याबरोबरच आणखीन एका गोष्टींचे तुम्ही निरीक्षण केले आहे का? विविध ई मार्केट कंपन्या याच काळात आपल्या वस्तूंवर खास ऑफर घेऊन येतात. या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही पाहू शकाल की सोने, वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे कमालीचे स्वस्त झालेले असतात. आणि जसा पितृपक्ष संपतो, तशी ही ऑफरची कालावधी देखील संपुष्टात येते. असे का केले जाते? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? चला जाणून घेऊया-

पितृपक्षचा काळ
पितृ पक्षाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या काळात आपल्या पूर्वजांचे आत्मा पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा, हवन, दान, पिंडदान, श्राद्ध इत्यादी अनेक धार्मिक कार्ये करतात. या काळात सोने, कार यासारखी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.

पितृ पक्षादरम्यानच मेगा ऑफर सेल का सुरू होतात?
पितृ पक्षादरम्यान, व्यवसायाच्या दृष्टीकोनातून संपूर्ण 15 दिवस थंड राहतात, कारण या दिवसांमध्ये बहुतांश लोक काहीही नवीन वस्तु खरेदी करणे किंवा गुंतवणूक करणे टाळतात. आणि याच कारणांमुळे ग्राहकांना आकर्षक ऑफर देऊन मंद झालेला व्यवसाय उचलून धरण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. जाणून घ्या कोणकोणत्या वस्तु या काळात स्वस्त होतात.

सोने चांदी
भारतात सोने केवळ गुंतवणुकीसाठी चांगले मानले जात नाही तर त्याची खरेदीही खूप शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत लोक पितृ पक्षात सोने, चांदी, हिरा, प्लॅटिनम इत्यादी धातू खरेदी करणे टाळतात. त्यामुळे या काळात दागिन्यांच्या विक्रीत दरवर्षी घट होते.

वाहन खरेदी
याशिवाय भारतातील लोक कार खरेदीसाठी शुभ मुहूर्ताची वाट पाहत असतात. पितृ पक्षात लोक अनेकदा कार खरेदी केली जात नाहीत. अशा परिस्थितीत, त्याच्या विक्रीतही घट होते, परंतु पितृ पक्ष संपल्यानंतर लोक नवरात्र, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात कार, मोटरसायकल किंवा कोणत्याही वाहनाच्या खरेदी करतात.

इलेक्ट्रॉनिक उपकरण
पितृ पक्षादरम्यान, लोक फ्रीज, एसी, सोफा इत्यादी, घरातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे यासारख्या नवीन वस्तू खरेदी करणे टाळतात. मात्र, नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत या वस्तूंच्या विक्रीत तेजी दिसून येते.

कपडे
या काळात लोकं नवीन कपडे देखील विकत घेत नाहीत. ज्याचा परिणाम वस्त्रोद्योगातही दिसून येतो. त्यामुळे अनेक ई मार्केटिंग कंपन्या महागड्या ब्रॅंडचे पोशाख या काळात विशेष ऑफरसह विक्रीला ठेवतात.



© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.