Badlapur rape case Update : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वतःवर गोळ्या झाडल्या
Sarkarnama September 24, 2024 08:45 AM

Badlapur rape case Update : बदलापूरमध्ये शाळेतील लहानमुलींवर अत्याचार प्रकरणात अटक असलेला आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या बंदुकीतून अक्षयने स्वतःवर गोळी चालवली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. अक्षयला वाचवण्यासाठी गेलेला एक पोलिस देखील गंभीर जखमी झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय याचा मृत्यू झाला आहे.

अक्षय याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने एका पोलिसाची बंदूक त्याने हिसकावली. आणि स्वतःवर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या डोक्याल देखील लागली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. दोन दिवसापूर्वी अक्षयने त्याच्यावरील सर्व आरोप मान्य केले होते.

(बातमी अपडेट होत आहे)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.