Badlapur Case: बदलापूर प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न! पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर झाडून घेतली गोळी
Times Now Marathi September 24, 2024 08:45 AM

Badlapur School Case: आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बदलापूरधील शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आरोपी अक्षय शिंदे यांने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून एक पोलिस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी अक्षयची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासााठी रुग्णालायत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

ऑगस्टमध्ये बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झालीची संतापजनक घटना समोर आली होती. या प्रकरणानंतर पालक आणि बदलापूर प्रचंड संतप्त झाले होते संतप्त झाले होते. त्यांनी आंदोलन करत बदलापूर रेल्वे स्थानक देखील बंद पाडले होते. या प्रकरणी शाळेत काम करणारा आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर तात्काळ कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली होती. तसेच बेजबाबदारपणासाठी शाळेतील कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आले होते.

बातमी अपडेट होत आहे.........
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.