Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात संजय राऊत यांचा अत्यंत गंभीर आरोप
GH News September 24, 2024 03:12 PM

“बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून. त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता. आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती. ज्याचं एन्काऊंटर केलं तो आणि संस्था चालक असं मोठ सर्कल आहे. एकाच आरोपीला अटक केली. आंदोलकांच्या घरात घुसून धिंड काढली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले” असं संजय राऊत म्हणाले. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात ते बोलत होते. “एन्काऊंटर खरं की, खोटं हे जनतेला माहित आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, ते आधी मागे घ्या. आरोपीच्या हाताता बेड्या आहेत. आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे. तरी सुद्धा कल्याण जंक्शनला आरोपी पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार करतो. संडास साफ करणारा पोरगा गोळ्या कधी चालवायला लागला. त्याला तुरुंगात असताना गोळ्या चालवायचं ट्रेनिंग यांनीच दिलं का?” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“24 वर्षांचा मुलगा पोलिसांच्या कमरेला असलेली बंदुक खेचून काढतो, पिस्तुल लॉक असते ना, हे सर्व संशायस्पद आहे. कोणालातरी वाचावायचं आहे. संस्थाचालक भाजपाशी संबंधित आहे. सीसीटीव्ही फुटेज गायब केलं” असे आरोप संजय राऊत यांनी केले. आरोपीच्या कृत्यासाठी संस्थाचालक कसे जाबदार? पत्रकारांच्या या प्रश्नावर संजय राऊत म्हणतात, “मग पॉस्को का लावला तुम्ही? संस्थाचालक सहभागी होते का? सीसीटीव्ही कुठे गायब केले? असे अनेक प्रश्न आहेत”

‘मला अंडरवर्ल्ड जेवढ माहितीय, तेवढं….’

“आज महाराष्ट्रात जरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलय, सरकारच्या खुर्चीला आग लावलीय. त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे केलय का? लोक संतापलेले आहेत. त्यासाठी हे केलय का? अशी शंका आली, तर त्यात चुकीच काय नाही हे साधं प्रकरण नाही” असं संजय राऊत म्हणाले. “मला मुंबईच अंडरवर्ल्ड जेवढं माहित आहे, तेवढं फडणवीस आणि ज्याने एन्काऊंटर केलं त्यांनाही माहित नसेल” असा दावा संजय राऊत यांनी केली.

म्हणून मुळापासून हे सर्व संपवलं का?

“संस्थाचालक फरार आहे. आपटे, कोतवाल, आठवले यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले. का गुन्हे दाखल केले? आम्ही सांगितलेलं का? तुम्ही गुन्हे दाखल केले, त्यांना अटक का होत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “माझ्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या आरोपीने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नये, म्हणून त्यांनी मुळापासून हे सर्व संपवलं” असा दावा संजय राऊत यांनी केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.