सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांची पिल्लं, व्हायरल व्हिडीओवर प्रशासन म्हणतंय…
GH News September 24, 2024 05:13 PM

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपती बालाजी मंदिराची ओळख आहे. या मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूत बीफ म्हणजे चरबी आणि माशांचं तेल वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर एकच वाद-विवाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता मुंबईतील प्रभादेवी येथे असणाऱ्या सिद्धीविनायक मंदिरीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्धिविनायक मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदरांचा वावर असल्याचा दावा करणारा कथित व्हिडीओ व्हायरल होतोय. मात्र या कथित व्हिडीओची टीव्ही 9 मराठी पृष्टी करत नाही. दरम्यान, मंदिर प्रशासनाने या व्हायरल व्हिडीओमध्ये तथ्य नसल्याचे म्हटलं आहे. हा व्हिडीओ फेक आहे, तो मंदिरबाहेरचाही असू शकतो, असेही मंदीर प्रशासनाने म्हटलं आहे. दरम्यान, प्रसादाच्या टोपलीत उंदीर असल्याच्या व्हिडीओची तपासणी करण्यात येईल, चौकशी होईल, असं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. मंदिर प्रशासनातर्फेही घडलेल्या प्रकाराची तपासणी होईल आणि योग्य ते स्पष्टीकरण देण्यात येईल, असंही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.