धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
abp majha web team September 24, 2024 07:13 PM

ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांना लय भारी ऑफर्स मिळत असतात, त्यात मोबाईल, स्मार्टफोन खेरदीवर ह्या भन्नाट ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येतो. आता, फ्लिपकार्टच्या बिग बिलिन डे सेलमध्ये सॅमसंग कंपनीने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतातील सर्वाधिक विक्री होणारा सॅमसंग 5जी स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी ए14 5जी फ्लिपकार्टच्‍या आगामी बिग बिलियन डेज सेलदरम्‍यान अद्वितीय ऑफर्ससह उपलब्‍ध केला आहे. ग्राहकांना 26 सप्‍टेंबरपासून बिग बिलियन डेजमध्‍ये 4 जीबी + 128 जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी 9999 रूपयांपासून सुरू होणाऱ्या निव्‍वळ खास किमतीत त्‍यांचा आवडता 5जी स्‍मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या डिलमध्‍ये 6500 रूपयांची नियमित सूट आणि 1000 रूपयांची त्‍वरित सूट (मूळ किंमत 17,499 रूपयांवर) असलेला स्मार्टफोन केवळ 9999 रुपयांत खरेदी करता येईल. 

सॅमसंग गॅलक्झीच्या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी + 128 जीबी व्‍हेरिएण्‍टचा मोबाईल फक्‍त 10,999 रूपयांच्‍या निव्‍वळ प्रभावी किमतीत उपलब्‍ध असेल. या मोबाईलच्या किमतीमध्‍ये 9 हजार रूपयांची नियमित सूट आणि 1000 रूपयांची त्‍वरित सूट (मूळ किंमत 20,999 रूपयांवर) मिळणार आहे. गॅलॅक्‍सी ए14 5जी मध्‍ये सिग्‍नेचर फ्लोटिंग कॅमेरा डिझाइनसह सॅमसंग गॅलॅक्‍सीचा एकमेव ५० मेगापिक्‍सल ट्रिपल रिअल कॅमेरा, तसेच हाय क्‍वॉलिटी फोटोंसाठी डेप्‍थ व मॅक्रो लेन्‍स, 6.6 इंच फुल एचडी+ डिस्‍प्‍ले आणि डॉल्‍बी अॅटमॉस सपोर्ट आहे. गॅलॅक्‍सी ए14 5जी डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्‍लॅक या तीन आकर्षक रंगांमध्‍ये येतो. या स्मार्टफोनमध्‍ये एक्झिनॉस 1330 प्रोसेसरची शक्‍ती आहे. हा स्‍मार्टफोन सेगमेंटमधील लीडिंग गीकबेंच स्‍कोअर्स वितरित करतो, ज्‍यामधून सुलभ कार्यक्षमतेची खात्री मिळते. तसेच, या स्‍मार्टफोनमध्‍ये 6 जीबी रॅमसह जवळपास 6 जीबी रॅम प्‍लस आहे, ज्‍यामुळे एकाचवेळी अधिक अॅप्‍स कार्यान्वित होऊ शकतात.  

व्हाईस फोकस लय भारी

गॅलॅक्‍सी ए14 5जी मध्‍ये सॅमसंगचे अद्वितीय 'व्हाईस फोकस' वैशिष्‍ट्य देखील आहे, जे पार्श्वभूमीमधील आवाजाला दूर करत कॉल्‍सदरम्‍यान वॉइस क्‍वॉलिटी वाढवते, ज्‍यामुळे गोंधळाचे वातावरण असताना देखील फोनवर सुस्‍पष्‍टपणे संवाद साधण्‍याची खात्री मिळते. हे वैशिष्‍ट्य गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्‍स, व्‍हॉट्सअॅप व झूम अशा व्हिडिओ आणि वॉइस कॉलिंग अॅप्‍ससोबत देखील काम करते, ज्‍यामुळे युजर अनुभव अधिक उत्‍साहित होतो. तसेच, सर्वोत्तम वन यूआय6 सॉफ्टवेअरसह वापरकर्ते व्हिडिओ वॉलपेपर्स किंवा इमोजीचा वापर करत लॉक स्क्रिन सानुकूल करू शकतात. वापरकर्ते व्‍यक्‍तींच्‍या कॉन्‍टॅक्‍ट्ससाठी अवतार्ससह कॉल पार्श्‍वभूमी देखील वैयक्तिकृत करू 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.