इराणी चषकाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. हा सामना रणजी विजेता संघ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळला जातो. मागच्या पर्वात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया असा सामना होणार आहे. मुंबईचं नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार असून 16 सदस्यीय खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी या सघाची घोषणा केली आहे. हा सामना 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळला जाणार आहे. या संघात सरफराज खानला एन्ट्री मिळणार आहे. कारण भारत बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याचा टॉस होण्यापूर्वी सरफराज खानला बीसीसीआय रिलीज करण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकुर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दुसरीकडे, सरफराज खान आणि शिवम दुबे यांना कर्तव्य मुक्त केलं तर त्यांचा संघात समावेश केला जाईल, असं एमसीएने स्पष्ट सांगितलं आहे. सरफराज खानला दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही तर रिलीज केलं जाईल. दुसरीकडे, शिवम दुबेला बांगलादेशविरुद्धच्या टी20 संघात स्थान मिळालं नाही तर इराणी ट्रॉफीत संधी मिळेल. दरम्यान सरफराज खानचा भाऊ मुशीर खान पृथ्वी शॉसह ओपनिंगाा उतरेल. दुसरीकडे, अजिंक्य रहाणे या सामन्यातून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी जागा मिळवण्यासाठी धडपड करताना दिसेल. जर त्याने या सामन्यात चांगली खेळी केली. तर त्याचा विचार केला जाऊ शकतो.
इराणी ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ , आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धांत अधातराव, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रॉयस्टन डायस.
इराणी ट्रॉफीसाठी भारताचा उर्वरित संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर)*, इशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल*, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद , राहुल चहर.