Chhattisgarh Naxal गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर काल मोठी चकमक झाली. दरम्यान, या चकमकीत गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात सक्रिय असलेला आणि 25 लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी (Naxal) रुपेश मडावीचा मृत्यू झाल्याच वृत्त समोर आले आहे. अबूझमाडच्या जंगलात काल छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत (Gadchiroli Police) झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते. यातील पुरुष माओवाद्याची ओळख पटली असून गेली वीस वर्ष गडचिरोली जिल्ह्याच्या माओवादी संघटनेत सक्रीय भूमिकेत असलेला रुपेश मडावी याचा त्यात समावेश आहे.
माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि कंपनी क्रमांक 10 चा कमांडर रुपेश मडावी हा आहे. त्याच्यावर 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून पोलीस उपनिरीक्षक वनमाने यांच्यासह काही पोलीस जवानांच्या हत्येचा तो गुन्हेगार आहे. तर दहापेक्षा जास्त हत्या, जाळपोळीचे आणि इतर गंभीर गुन्ह्यातही रुपेश मडावीचा सहभाग असून अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे. परिणामी, त्यावर शासनाने 25 लाख रुपय किमतीचे बक्षीसही ठेवले होते. मात्र काल झालेल्या चकमकीत अखेर त्याचा मृत्यू झाल्याने नक्षलविरोधी मोहिमेला आणखी एक मोठे यश आले आहे. सध्या पोलीस या परिसरात अधिक तपास करत असून नक्षल्यांच्या विरोधात मोहीम अधिक बळकट केली जात आहे.
भंडारा शहरात सोमवारच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास थरारक घटना घडली. MH 09 DR 7077 या स्कोडा कंपनीच्या वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरातून गांधी चौक आणि राजीव गांधी चौकाकडील मार्गावरून सुसाट वेगानं वाहन चालवीत या वाहन चालकानं वाटेत आलेल्या दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांना धडक देत सुसाट पळाला. ही थरारक घटना घडल्यानंतरही वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात सहा ते सात नागरिक किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस पथकानं नाकाबंदी करीत चालकाला वाहनासह ताब्यात घेतलं. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा