Balasaheb Thorat : तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच तुम्ही निरपेक्षित ठराल असं वक्तव्य कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं. काल वनी येथे उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने गेले असता हेलीपॅडवर त्यांच्या बॅगची तपासणी झाली, बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाला अधिकार आहेत, ते आपण मान्य केले पाहिजे. पण हे करत असताना कधी फरक केला नाही पाहिजे असेही थोरात म्हणाले.
एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये मी 14 वर्षे खूप सोसले असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर देखील बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले अनेक मंत्रीपद सांभाळले त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात आपल्याकडे घेतले होते. एवढं बांधकाम करायचं म्हणल्यावर त्रास तर होणारच असा टोला देखील थोरात यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.सर्वेला आता निवडणूक आयोगाकडून परवानगी नाही, आता हे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धीचे राजकारण आहे, दिशाभूलीचा भाग आहे असे थोरात यांनी सांगितले. आम्ही महाविकास आघाडी म्हणून बहुमत मिळवणार असल्याचे सुद्धा थोरात यांनी सांगितले.
भोकरमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रचार सभेमध्ये एक वक्तव्य केले होते की दिल्लीहून फर्मान निघालेला आहे, अशोक चव्हाण यांना संपवा यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांना विचारले असता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाऊनच संपले आहेत. नांदेडची परिस्थिती पहा जो माणूस दिमागदारपणे फिरत होता, त्यांना मान सन्मान होता, आजची परिस्थिती काय आहे?तुम्हाला तुमचे खासदार निवडून आणता येत नाहीत, आमदार निवडून येत नाही, तुम्ही तुमच्या सन्मान घालवलेला आहे आणि तुम्हाला संपवण्याची गरज ही आता आम्हाला नाही. तुमच राजकारण तुम्ही तुमच्या हाताने संपवलं आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
भाजपचे राजकारण हे भेदाच राजकारण असल्याचे थोरात यांनी सांगितले. माणसापासून माणूस दूर करायचा, जातीपासून जाती दूर करायच्या, धर्म दूर करायचे भेदाच्या आधारावर मत घ्यायचे आणि सत्ता मिळवायची त्यामुळेच त्यांनी बटेंगे तो कटेंगे म्हणलं आहे असं थोरात यांनी सांगितले.