रुपाली बडवे, साम टीव्ही
मुंबई : विधानसभा निवडणुकसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील माहीममधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीममध्ये ठाकरे गटानेही उमेदवार रिंगणात उतरवला आहे. पहिल्यांदा आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली, त्यावेळी मनसेने उमेदवार दिला नव्हता. यावरून राज ठाकरेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
वरळीतील राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्देमाझी कोळीवाड्यात सभा झाली. त्यानंतर जांबोरी मैदानात सभा घ्यायची असं संदिपने सांगितलं. एकाच मतदारसंघात २ सभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आता काही लोकांची नाटकं बघत आहेत. मला का तपासलं? बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना कळायला हव होतं की, ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाहीत ते बॅगेत पैसे ठेवणार का?
माझ्या आता मुलाखती सुरु आहेत. सगळ्यांचा प्रश्न की तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. पण यांच्या त्यांनी उमेदवार दिला. आता हा प्रत्येकाच्या वृत्तीचा भाग आहे.
मला म्हणतात की, भूमिका बदलली. राष्ट्रवादी आणि इतरांनी स्वार्थासाठी जे केलं, त्याला भूमिका बदलणं म्हणतात.
मी नरेंद्र मोदींना समर्थन दिलं. त्यानंतर दिलं नाही. मला जे पटलं, ते मी बोलतो.
काँग्रेसच्या काळातील गोष्टी पुन्हा होऊ लागल्या म्हणून मी विरोध केला. त्या मागे अजूनही गोष्टी आहेत.
२०१९ नंतर काही गोष्टी बदलल्या. काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. आयोध्येत राम मंदिर बांधलं.
माझा काय स्वार्थ होता. मी कोणतं पद मागितलं का? शरद पवारांच्या बाबतीत तर बोलायला नको. त्यांच संपूर्ण आयुष्य हे भूमिका बदलण्यात गेलं.
मनसे पक्षाने किती भूमिका बदलल्या. इतिहास काढा.